Harmanpreet Kaur Fight With Sophie Ecclestone Viral Video : महिला प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. युपी विरुद्धच्या लढतीत दमदार विजय नोंदवत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या महिला संघानं प्ले ऑफच्या दिशेन आपलं एक पाऊल पुढे टाकले आहे. आतापर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्स संघाला प्ले ऑफ्सच तिकीट मिळाले असून अन्य चार संघात तगडी चुरस पाहायला मिळते. एका बाजुला प्ले ऑफ्सच्या रंगत निर्माण झाली असताना मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्ज यांच्यातील सामन्यात हरमनप्रीत कौर आणि यूपीच्या ताफ्यातून खेळणारी सोफी एसलस्टोन यांच्यात भांडण झाल्याचा सीन चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दोघांच्यातील वादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. नेमकं काय घडलं? भर मैदानात हरमनप्रीत कौर तिच्यावर का चिडली? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौर अन् सोफी यांच्यात क झालं भांडण?
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात यूपी वॉरियर्जच्या डावातील अखेरच्या षटकात हरमनप्रीत कौर आणि सोफी यांच्यात तू तू मै मै! सीन पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सच्या संघानं निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे नियमानुसार, अखेरच्या षटकात फक्त तीन फिल्डरच बाउंड्री लाईनवर असतील, अशी मैदानातील अंपायरने हरमनप्रीतला सूचना केली. या मुद्यावर हरमप्रीत अंपायरसोबत चर्चा करत असताना क्रीजवर असलेल्या सोफीनं अंपायरकडे पाहून इशारा करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट हरमप्रीत कौरला चांगलीच खटकली. अन् दोघींच्यात खटका उडाला. मैदानातील अंपायर्संनी मध्यस्थी करत हरमनप्रीत अन् सोफी यांच्यातील वाद मिटवून सामना पुढे सुरु केल्याचा सीन पाहायला मिळाला.
निर्णय मुंबई इंडियन्सच्या विरोधात, पण यूपीला उठवता आला नाही फायदा
हरमनप्रीत कौरनं अंपायर्ससोबत चर्चा केली. पण अंपायर्संनी वेळ पाळा नाहीतर नियम पाळा हा तोरा दाखवून देत फक्त तीन फिल्डर सर्कल बाहेर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. हरमनप्रीत कौरनं अंपायर्सची चर्चा केली चर्चेत नाक खुपसणाऱ्या सोफीशी ती नडली पण शेवटी मुंबई इंडियन्सला नियम पाळावाच लागला. पण यूपीचा संघ याचा फायदा घेऊ शकला नाही. त्यांना फक्त अखेरच्या षटकात ७ धावाच जमा करता आल्या.
Web Title: WPL 2025 Mumbai Indians Captain Harmanpreet Kaur Fight With UP Warriorz And England Star Sophie Ecclestone During 16th Match Watch Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.