Join us

WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मुंबई इंडियन्स महिला संघानं दुसऱ्यांदा केला २०० धावा पार करण्याचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 22:06 IST

Open in App

Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women, Eliminator : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या महिला प्रीमियर लीगच्या एलिमेनेटरच्या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई इंडियन्सच्या तिघींनी धमाकेदार बॅटिंग केली. सलामीवीर यश्तिका अवघ्या १५ धावांवर बाद झाल्यावर मेथ्यू हेली ७७ (५०) (Hayley Matthews) आणि नॅटली सायव्हर ब्रंट ७७ (४१) (Nat Sciver-Brunt) यांनी  १३५ धावांची दमदार शतकी भागीदारी रचली.  या दोघींच्या खेळीनंतर  कॅप्टन हरमनप्रीतनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हरमनप्रीतची तुफान फटकेबाजी

हरमनप्रीत कौरनं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावण्याआधी अखेरच्या षटका १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ३०० च्या स्ट्राइक रेटनं ३६ धावा कुटल्या. तिच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघानं WPL च्या इतिहासातील २१३ अशी आपल्या संघाची सर्वोच्च धावसंख्या उभारत  गुजरात जाएंट्ससमोर २१४ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले.    

मुंबई इंडियन्स महिला  संघानं दुसऱ्यांदा पार केला २०० पारचा आकडा

WPL च्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं आतापर्यंतच्या इतिहासातील चौथी सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. नवव्यांदा या स्पर्धेत एखाद्या संघानं २०० धावसंख्येचा आकडा गाठल्याचे पाहायला मिळाले.  मुंबई इंडियन्सनं या स्पर्धेत दुसऱ्यांदा २०० पारचा आकडा गाठला. याआधी २०२३ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं गुजरात विरुद्धच्या सामन्यातच २०७ धावसंख्या उभारली होती. हा विक्रम मोडीत काढत मुंबई इंडियन्सच्या संघानं नवा विक्रम सेट केला आहे.   

WPL मध्ये २०० पार धावसंख्येचा रेकॉर्ड

  • यूपी वॉरियर्स- २२५ धावा विरुद्ध आरसीबी, ८ मार्च २०२५
  • दिल्ली कॅपिटल्स- २२३ धावा विरुद्ध आरसीबी,  ५ मार्च २०२३
  • आरसीबी- २१३ धावा विरुद्ध यूपी वॉरियर्स, ८ मार्च २०२५
  • मुंबई इंडियन्स- २१३ धावा विरुद्ध गुजरात जाएंट्स, १३ मार्च २०२५ 
  • दिल्ली कॅपिटल्स -२११ धावा विरुद्ध यूपी वॉरियर्स, ७ मार्च २०२३ 
  • मुंबई इंडियन्स- २०७ धावा विरुद्ध गुजरात जाएंट्स, ४ मार्च २०२३
  • आरसीबी- २०२ धावा विरुद्ध गुजरात जाएंट्स, १४ फेब्रुवारी २०२५
  • गुजरात जाएंट्स-  २०१ धावा विरुद्ध आरसीबी, १४ फेब्रुवारी २०२५
  • गुजरात जाएंट्स- २०१ धावा विरुद्ध आरसीबी, ६ मार्च २०२४
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगहरनमप्रीत कौरमुंबई इंडियन्समहिला टी-२० क्रिकेट