Litchfield Registers Her Maiden World Cup Century Also The Fastest Ton In Women’s CWC Knockout History : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली स्वस्तात माघारी फिरली. टीम इंडियाला सहाव्या षटकातच पहिले यश मिळाले. पण त्यानंतर फीबी लिचफिल्डचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न' टीम इंडियासाठी खरी डोकेदुखी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी सेंच्युरी
ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक सलामी फलंदाजीनं वर्ल्ड कपमधील पहिलं शतक झळकावत खास विक्रम रचला. केवळ ७७ चेंडूत शतक झळकावले. वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यांतील हे सर्वात जलद शतक ठरले.
IND vs AUS 2nd Semi Final : 'वनडे क्वीन'चा 'लेडी सेहवाग'सोबतचा रेकॉर्ड दमदार, पण...
ट्रॅविस हेडच्या पॅटर्नमध्ये केली तुफान फटकेबाजी
फीबी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. तिच्या स्फोटक फटक्यांमुळे ती ऑस्ट्रेलियन पुरुष संघातील ट्रॅविस हेडची महिला आवृत्ती म्हणून ओळखली जाते. हेड हा टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धांमध्ये कायमचा ‘जानी दुश्मन’, आणि आज फीबीनंही त्याच पद्धतीचा धडाका दाखवत भारतीय गोलंदाजांना हैराण केलं.
मॅक्सवेलचा तोरा दाखवयला गेली अन् फसली
ऑस्ट्रेलियाने २५ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर फीबी आणि एलिसा पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचली. फीबीनं ९३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. शेवटी अमनजोत कौरच्या चेंडूवर मॅक्सवेलच्या अंदाजात फटका मारण्याचा डाव तिच्या अंगलट आला आणि टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून महिला वर्ल्ड कप स्पर्धेत नॉकआउट्स लढतीमध्ये शतक झळकवणारी ती तिसरी बॅटर ठरली. या यादीत एलिसा हिली दोन शतकांसह अव्वलस्थानी आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाकडून वनडे वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये शतके झळकवणाऱ्या बॅटर
- १७० - एलिसा हीली विरुद्ध इंग्लंड, ख्राइस्टचर्च, २०२२फायनल
- १२९ - एलिसा हीली विरुद्ध वेस्ट इंडिज, वेलिंग्टन, २०२२ सेमीफायनल
- १०७ - (नाबाद)* – करेन रोल्टन विरुद्ध भारत, सेंच्युरियन, २००५ फायनल
- ११- फीबी लिचफिल्ड विरुद्ध भारत, मुंबई (डी. वाय. पाटील), २०२५ सेमीफायनल