लखनौ : अमेलिया करच्या ५ बळींमुळे युपी संघाला १५० धावांवर रोखल्यानंतर सामनावीर हिली मॅथ्युजने (६८) दमदार अर्धशतक झळकावत मुंबईला सहज विजयी केले. ६ विकेट्स राखून मिळवलेल्या या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत आता दुसऱ्या स्थानावर आला असून त्यांनी प्लेऑफच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेलियाचा भेदक माऱ्यासमोर अडखळली युपीची गाडी
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या गुजरात संघाने धमाकेदार सुरुवात केली. जॉर्जिया वोल (५५) आणि ग्रेस हॅरिस (२८) या सलामीच्या जोडीने ८ षटकांत ७४ धावांची सलामी दिली, पण या दोघी १६ धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर युपीची गाडी अडखळली. अमेलिया करच्या भेदक गोलंदाजीमुळे युपीने ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. कर्णधार दीप्ती शर्माच्या (२७) छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळीमुळे युपीचा संघ ९ बाद १५० धावांचे लक्ष्य उभारू शकला. प्रत्युत्तरात, हिली मॅथ्युज आणि नॅट स्कीव्हर ब्रंट (३७) यांनी ९२ धावांची झंझावाती भागीदारी करून मुंबईचा विजय दृष्टिपथात आणला.
संक्षिप्त धावफलक
युपी : २० षटकांत २ बाद १५० धावा (जॉर्जिया वोल ५५, ग्रेस हॅरिस २८, दीप्ती शर्मा २७) गोलंदाजी : अमेलिया कर ५/३८, हिली मॅथ्युज २/२५, नॅट स्कीव्हर ब्रंट १/१६, पारुनिका सिसोदिया १/२१. मुंबई : १८.३ षटकांत ४ बाद १५३ धावा (हिली मॅथ्युज ६८, नॅट स्कीव्हर ब्रंट ३७) गोलंदाजी : ग्रेस हॅरिस २/११, सिनेल हेन्री १/२८, क्रांती गौड १/३१.