रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महिला वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत आज इतिहास घडणार आहे. भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फायनलमध्ये कोणीही जिंकले तरी तो संघ प्रथमच महिला क्रिकेट वर्ल्डकप उंचावणारा संघ ठरणार आहे. महिला क्रिकेटविश्वाला रविवारी नवे विश्वविजेते लाभतील. त्यातच भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळणार असल्याने आतापर्यंतची सर्व कसर भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
भारत
मजबूत बाजू : जागतिक दर्जाचा फिरकी मारा. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांचा प्रदीर्घ अनुभव.कमजोर बाजू : फलंदाजी प्रामुख्याने स्मृती मानधनावर अवलंबून. सामन्यावर वर्चस्व मिळवल्यानंतर अखेरच्या क्षणी नियंत्रण गमावले जाते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागेल.
मजबूत बाजू : कर्णधार लाॅरा वाॅल्वार्डट व अष्टपैलू मारिझान काप सर्वोत्तम फाॅर्ममध्ये. खोलवर असलेली फलंदाजी. गोलंदाजीत भक्कम असलेला वेगवान मारा.कमजोर बाजू : फलंदाजांमध्ये असलेला सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव. गोलंदाजीत फिरकी मारा फारसा प्रभावी नाही.
Web Summary : Today, the Women's World Cup final sees India or South Africa creating history. It's a first-time title for either team. India, in its third final, aims to capitalize on past near-misses. Key strengths and weaknesses for both teams highlighted.
Web Summary : आज महिला वर्ल्ड कप के फाइनल में भारत या दक्षिण अफ्रीका इतिहास रचेंगे। दोनों में से कोई भी टीम पहली बार खिताब जीतेगी। भारत, अपने तीसरे फाइनल में, पिछली असफलताओं का फायदा उठाने का लक्ष्य रखेगा। दोनों टीमों की मुख्य ताकत और कमजोरियों पर प्रकाश डाला गया।