वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी-२० सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने १७१ धावांचा पाठलाग करताना १७ व्या षटकातच हा सामना खिशात घातला. या विजयासह पाहुण्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या यजमान वेस्ट इंडिज संघाला घरच्या मैदानावर ५-० अशी मात दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन संघानं सेट केला विक्रम, असा पराक्रमक करणारा ठरला दुसरा संघ ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच पाच सामन्यांची टी-२० मालिका ५-० अशी जिंकली आहे. वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर व्हाईट वॉश देत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या विक्रमाशी देखील बरोबरी साधली आहे. घरच्या मैदानात यजमान संघाचा ५-० अशा धुव्वा उडवणारी ऑस्ट्रेलिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी भारतीय संघाने हा पराक्रम करून दाखवला होता.
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
भारत-ऑस्ट्रेलियाशिवाय या मोजक्या संघांनी साधलाय हा डाव
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने २०२० च्या न्यूझीलंड दौऱ्यावर ५ सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकली होती. टीम इंडियाच्या या विक्रमाशी ऑस्ट्रेलियन संघाने बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक देश आंतरारष्ट्रीय टी-२० सामने खेळतात. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्याशिवाय फक्त मोजकल्या देशांनीच पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिकेतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. यात मलेशिया, केमॅन आइलंड्स, तंजानिया आणि स्पेन यांचाही समावेश आहे.
शिमरॉन हेटमायरचं अर्धशतक
पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅरेबियन संघाने पॉवर प्लेमध्येच आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायर याने ३१ चेंडूत केलेल्या ५२ धावांच्या खेळीसह शर्फेन रदरफोर्डच्या १७ चेंडूतील उपयुक्त ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने १७० धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शुइस याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.टीम डेविड आणि ओवेनचा धमाका
वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या २५ धावांवर पाहुण्या संघाने आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर टीम डेविडनं १२ चेंडूत ३० धावांची खेळी करत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. याशिवाय ओवेन याने १७ चेंडूत ३७ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा मार्ग सोपा केला.