बईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून दिमाखदार विजय नोंदवला. आधी साखळी फेरीत, मग सुपर फोर आणि त्यानंतर फायनलचं मैदान मारत टीम इंडियानं एकाच स्पर्धेत तीन वेळा पाकिस्तान क्रिकेट संघाची जिरवली. फक्त क्रिकेट खेळायला आलोय, पाकिस्तानी खेळाडूंची हात मिळवायला नाही, अशी भूमिका घेत टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या लढतीला सुरुवात केली होती. त्याचा शेवट टीम इंडियाने पाकिस्तानी मंत्री अन् आशियाई क्रिकेट परिषदेचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट ACC अध्यक्ष अन् पाक मंत्री मोहसिन नक्वी यांची जगासमोर अब्रू काढण्यातला प्रकार होता. ही वेळ येण्यामागे ते स्वत:ही तेवढेच कारणीभूत आहेत. जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं प्रोटोकॉल मोडला, ACC अध्यक्षाला ती पोस्ट महागात पडली?
IND vs PAK Final Asia Cup
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हे या निर्णयामागचं प्रमुख कारण आहे. त्याशिवाय फायनल आधी मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या पोस्टनं वातावरण आणखी तापवल्याचे बोलले जात आहे. मोहसिन नक्वी यांनी फायनलआधी सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली होती. 'फायनल डे'चा माहोल दाखवणाऱ्या या पोस्टमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा, जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अन् हारिस रौफ याच्यासह अन्य खेळाडूंना फायटर जेटच्यासमोर फ्लाइट सूटमध्ये दाखवण्यात आले होते. क्रिकेट प्रशासकानं राजकीय विचाराने प्रेरित पोस्टसह फायनलला क्रिकेट संघाच्या माध्यमातून सैन्य शक्ती प्रदर्शनाचा जो खेळ खेळला, तो मोहसिन नक्वी यांच्या अंगलट आला, असेही बोलले जात आहे.
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
आधी पाकिस्तान संघाची जिरवली, मग जगासमोर पाक मंत्र्याची फजिती
टीम इंडियान खेळ आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं म्हणत आशिया कप स्पर्धेत खेळण्याची तयारी दर्शवली होती. पण मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राजकीय गोष्टीवर भर दिला. जर त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली तर याचा अर्थ त्यांच्या भडकाऊ पोस्टला समर्थन दिल्याचा प्रकार होईल, हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, असेही समोर येत आहे. दुबईच्या मैदानात पाकिस्तानी संघाची जिरवल्यावर प्रोटोकॉल मोडत टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षस्थानी बसलेल्या पाक मंत्र्याची अब्रूच काढल्याचे पाहायला मिळाले.