वन डे क्रिकेटमध्ये मंगळवारी चौकार-षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. नॉर्थ बंगाल क्रिकेट अकादमी आणि टॅलेंट हंट क्रिकेट अकादमी यांच्यातल्या सामन्यात जवळपास 48 षटकार व 70 चौकारांची आतषबाजी झाली. नॉर्थ बंगाल क्रिकेट अकादमीनं 4 बाद 432 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात टॅलेंट हंट क्रिकेट अकादमीनेही 7 बाद 386 धावा कुटल्या. अवघ्या 46 धावांनी त्यांना हार मानावी लागली.
ढाका येथे खेळवण्यात आलेल्या या बांगलादेश सेंकड डिव्हिजन सामन्यानं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. या सामन्यात नॉर्थ बंगाल संघानं 27 षटकार खेचले, तर टॅलेंट हंट संघानं 21 वेळा चेंडू सीमापार पाठवला. ''ढाका क्रिकेटमध्ये असा खेळ कधी पाहिला नव्हता,'' असे क्लब क्रिकेटचे आयोजक सय्यद अली असाफ यांनी सांगितले.
IND Vs NZ : टीम इंडियाचा कसून सराव अन् रिषभ पंतचा आराम...
ऑस्ट्रेलिया ओपन : पुन्हा एकदा पाच सेट्सचा थरार अन् रॉजर फेडररची उपांत्य फेरीत एन्ट्री
IPL 2020: काय सांगता? विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी एकाच संघातून खेळणार
Video : विराट कोहलीचा खतरनाक स्टंट; पाहाल तर 'उडाल'!
आयपीएल आयोजनासाठी अमेरिकन कंपनीला दिले जातात 35 कोटी, जाणून घ्या कारण
आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...
हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...
Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा
मुंबईत रंगणार आयपीएलचा अंतिम सामना; २४ मेला ठरणार विजेता