कोण आहे Isa Guha? जसप्रीत बुमराहसंदर्भातील तिची कमेंट का ठरली वादग्रस्त?

कोण आहे ईशा गुहा? तिने नेमकी कोणती कमेंट केली ज्यामुळे वाद निर्माण झाला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:34 IST2024-12-16T12:33:20+5:302024-12-16T12:34:52+5:30

whatsapp join usJoin us
Who Is Isa Guha Gives Racist Comment To Jasprit Bumrah Apologises After Controversy Like Monkeygate controversy | कोण आहे Isa Guha? जसप्रीत बुमराहसंदर्भातील तिची कमेंट का ठरली वादग्रस्त?

कोण आहे Isa Guha? जसप्रीत बुमराहसंदर्भातील तिची कमेंट का ठरली वादग्रस्त?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Who is Isa Guha: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान ईशा गुहा हे नाव चर्चेत आले आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहसंदर्भात तिने एक कमेंट केली. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणात तिने माफीही मागितली आहे. इथं जाणून घेऊयात कोण आहे ईशा गुहा? तिने नेमकी कोणती कमेंट केली ज्यामुळे वाद निर्माण झाला अन् तिच्यावर माफी मागण्याची वेळ आली त्यासंदर्भातील खास स्टोरी

कोण आहे Isa Guha?


ईशा गुहा हा क्रिकेट जगतातील एक लोकप्रिय चेहरा आहे. ती एक माजी क्रिकेट आहे. तिला इंग्लंड महिला क्रिकेटरचा टॅग लागला असला तरी ती मूळची भारतीय वंशाची आहे. इंग्लंड महिला संघाचे प्रतिनिधीत्व करणारी पहिली भारतीय महिला अशीही तिची एक वेगळी ओळख सांगता येईल. १९७० मध्ये तिचे आई-वडील  कोलकाताहून यूकेला स्थायिक झाले होते. २००५ आणि २००६ मध्ये झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतही ती इंग्लंडच्या संघाकडून खेळताना दिसली होती. 

सध्या ती काय करते?


क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ती कॉमेंटेटरच्या रुपात बोलंदाजी करताना दिसते. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ती फॉक्स क्रिकेटच्या कॉमेंट्री पॅनलची सदस्या आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील जसप्रीत बुमराहच्या दमदार कामगिरीनंतर ती भारतीय गोलंदाजाचे कौतुक करायला गेली. पण तिने जो शब्द वापरला त्यामुळे नवा वाद निर्माण झाला.

तिनं कोणती कमेंट केली? ती का ठरली वादग्रस्त?

ईशा गुहा हिने जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव करताना प्रायमेट्स (Primates) असा उल्लेख केला. ज्याचा अर्थ नरवानर असा होतो. त्यामुळे तिची ही कमेंट्स नेटकरी (Isa Guha Racist Comment on Bumrah) थेट 'मंकीगेट' प्रकरणाशी जोडत आहेत. तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिची कमेंट वर्णभेद असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. याप्रकरणात ईशानं आपल्याला नेमकं काय म्हणायचं होते ते स्पष्ट करत माफीही मागितली आहे.

 काय होतं 'मंकीगेट' प्रकरण? 

 २००७-०८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्रू सायमंड्स यांच्यात मैदानात रंगलेला स्लेजिंगचा खेळ चांगलाच गाजला होता. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पाँटिंगसह संपूर्ण संघानं हरभजन सिंगवर गंभीर आरोप केले होते. अँड्रू सायमंड्सच्या देहबोलीवरून भज्जीने त्याला  'माकड' म्हणून डिवचले, असा तो आरोप होता.  हे प्रकरण 'मंकीगेट'च्या रुपात गाजले होते.

Web Title: Who Is Isa Guha Gives Racist Comment To Jasprit Bumrah Apologises After Controversy Like Monkeygate controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.