What's Your Skincare Routine Harleen Deol Asks PM Modi : मुंबईच्या मैदानात कर्तृत्व दाखवून देत विश्वविजेतेपद उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने दिल्ली दरबारी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत संघातील खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोटो सेशन केल्यावर खास गप्पा गोष्टी केल्या. यावेळी भारतीय महिला संघातील ब्युटीनं पंतप्रधान मोदींसमोर आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवतून थेट पंतप्रधानांना त्यांच्या स्किन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् हरलीन देओलन मोदींना विचारला स्किन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
हरलीन देओल ही भारतीय महिला संघातील माहोल एकदम मस्त ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. भारतीय महिला संघातील खेळाडूंसोबतच्या चर्चेत PM मोदींनी संघातील खेळाडूंना संघात हसत खेळत वातावर ठेवण्यात कोण पुढे असते? असा प्रश्न विचारला होता. यावर सगळ्या जणींनी एका सुरात जेमिमा रॉड्रिग्जचं नाव घेतलं. पण जेमीन चेंडू हरलीन देओलकडे टोलावला. हरलीन देओल हिने संघातील वातावरण कसे हलके फुलके ठेवते हे सांगितल्यावर तिने PM मोदींनी स्किन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न विचारला. तुमच्या चेहऱ्यावरील तेज दिसते, असेही ती म्हणाली. यावर एकच हशा पिकला. मोदीजींनाही हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
PM मोदींनी असा दिला रिप्लाय
.
हरलीन देओलच्या प्रश्नावर उत्तर देताना मोदीजी म्हणाले की, खरंतर मी या गोष्टीकडे तसं लक्ष देत नाही. सरकारला २५ वर्षे झाली आहेत. देशवासियांचे मिळारे प्रेम आणि आशीर्वाद याचाच हा प्रभाव असेल. हरलीन देओलचा प्रश्न आणि त्यावर मोदीजींनी दिलेला रिप्लाय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.