Asia Cup 2025 Final India vs Pakistan Suryakumar Yadav On PM Modi : दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानला चितपट करत या स्पर्धेतील दबदबा कायम राखला. भारतीय संघाने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकलीये. सूर्यकुमार यादव हा टी-२० आशिया कप स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरलाय. याआधी २०१६ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कमाल केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
PM मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा
भारतीय संघाच्या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संघाचे अभिनंदन केले होते. 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला देत मैदान कोणतेही असो भारत जिंकतोच, अशा शब्दांत मोदींनी टीम इंडियाचं कौतुक केलं होते. आता सूर्यकुमार यादवची यावर प्रतिक्रिया आली आहे.
Asia Cup Winner Indian Captains : सूर्यकुमार यादव थेट MS धोनीच्या पंक्तीत
PM मोदींसंदर्भात काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
टीम इंडिया पाकविरुद्ध खेळली, पण...
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच हायहोल्टेज ड्रामा असतो. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा समोरा समोर आले. फक्त क्रिकेट खेळायला आलोय अशी भूमिका घेत भारतीय संघाने पाकिस्तान खेळाडूंपासून चार हात लांब रहाणं पसंत केले. फायनल जिंकल्यावरही पाकिस्तानी मंत्र्याच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. या गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
Web Summary : Suryakumar Yadav lauded PM Modi's support after India's Asia Cup victory against Pakistan. He felt Modi's encouragement was like him taking strike and scoring runs, boosting the team's morale. India's win sparked celebrations nationwide.
Web Summary : पाकिस्तान के खिलाफ एशिया कप में भारत की जीत के बाद सूर्यकुमार यादव ने पीएम मोदी के समर्थन की सराहना की। उन्होंने महसूस किया कि मोदी का प्रोत्साहन ऐसा था जैसे वह खुद स्ट्राइक लेकर रन बना रहे हों, जिससे टीम का मनोबल बढ़ा। भारत की जीत से पूरे देश में जश्न मनाया गया।