IND vs SA, Suryakumar Yadav’s Bold Statement After India’s Loss In 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत धमाक्यात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पाहुण्या संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा धक्का दिला. २१४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १६२ धावांवर आटोपला. भारतीय संघाचा टी-२० मधील घरच्या मैदानातील धावांच्या अनुषंगाने सर्वात मोठा पराभव ठरला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफे जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करून फसलो, असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर प्रत्येक वेळी अभिषेक शर्मावर विसंबून राहून चालणार नाही, असे म्हणत त्याने थेट त्याच्यासोबत भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या आणि टी-२० संघात उप कर्णधार पदाची जबाबादीर देण्यात आलेल्या शुभमन गिलचं नावही घेतले. पराभवानंतर नेमकं सूर्या काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉस जिंकून फसलो!
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "आम्ही फलंदाजी घ्यायला हवी होती असं वाटतं. आम्ही आधी गोलंदाजी केली आणि फार काही करता आलं नाही. या विकेटवर योग्य लेंथ किती महत्त्वाची आहे ते नंतर लक्षात आले. तो पुढे म्हणाला की, थोडंसं दव होतं. पहिली योजना काम करत नसेल तर दुसरी योजना वापरायला हवी. आम्ही तो प्रयत्नच केला नाही. त्यांनी दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी केली, त्यातून आम्ही शिकलो आणि पुढच्या सामन्यात या चुका होणार नाहीत, याची काळजी घेऊ."
सूर्या म्हणाला की, शुभमन पहिल्या चेंडूवरच बाद झाला अन्... तो पुढे म्हणाला की, माझ्यासह शुभमनने चांगली सुरुवात द्यायला हवी होती. अभिषेकवर नेहमी विसंबून चालणार नाही. तो जरी चांगला खेळत असला तरी त्याचाही एखादा दिवस खराब असू शकतो. त्यामुळे इतर फलंदाजांनी ती जबाबदारी घ्यायला हवी होती. शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तो बाद झाल्यावर मला जबाबदारी घ्यायला हवी होती, पण मीही टिकलो नाही, ही गोष्टही त्याने मान्य केली.
अक्षर पटेलला दिलेल्या बढतीबद्दलही बोलला
शुभमन गिल स्वस्तात माघारी फिरल्यावर अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. हा प्रयोगही समजण्यापलिकडचा होता. यावर सूर्यकुमार म्हणाला की, "मागच्या सामन्यात आम्ही अक्षरला मोठ्या प्रारुपात चांगली फलंदाजी करताना पाहिलं होतं. आजही आम्हाला त्याच्याकडून तशा खेळीची अपेक्षा होती. त्याने चांगली फलंदाजी केली. पण शेवटी हा प्रयोग फसवा ठरला. पुढच्या सामन्यात काय बदल करायचा ते पाहू."
Web Summary : After India's T20I loss to South Africa, Suryakumar Yadav admitted his decision to bowl first backfired. He highlighted Shubman Gill's early dismissal and the team's over-reliance on Abhishek Sharma, emphasizing the need for collective batting responsibility. Axar Patel's promotion also failed.
Web Summary : दक्षिण अफ्रीका से टी20 हार के बाद, सूर्यकुमार यादव ने पहले गेंदबाजी करने के फैसले को गलत बताया। उन्होंने शुभमन गिल के जल्दी आउट होने और टीम की अभिषेक शर्मा पर अधिक निर्भरता पर प्रकाश डाला, सामूहिक बल्लेबाजी जिम्मेदारी की आवश्यकता पर जोर दिया। अक्षर पटेल का प्रमोशन भी विफल रहा।