टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाचा भाग असलेला वॉशिंग्टन सुंदर हा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी झालेल्या वनडे मालिकेत वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. तो BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे पुनर्वसन प्रक्रियेत आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात परतण्यासाठी त्याने नेट्समध्ये फलंदाजी केल्याची गोष्ट समोर आली असली तरी पहिल्या सामन्यापासून संघाचा भाग असणार का? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वॉशिंग्टन सुंदरन नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने बुधवारी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. जवळपास ३० मिनिटे फलंदाजी केल्यानंतर दुखापतीतून तो शंभर टक्के तंदुरुस्त नाही, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय संघ ७ फेब्रुवारीला मुंबईच्या मैदानात नियोजित अमेरिकेविरुद्धच्या लढतीने टी-२० वर्ल् कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यात तो खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण तरीही संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडूचा विचार केलेले नाही. कोणतीही घाई गडबड न करता तो शंभर टक्के फिट असल्याची खात्री करूनच यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
टी-२० वर्ल्डकपनंतर गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवणार? बीसीसीआयनं स्पष्ट केली आपली भूमिका
रवी बिश्नोईच्या रुपात सर्वोत्तम पर्याय मिळाला, तरीही तो वेटिंगवर कारण
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना डावखुर्या फलंदाजांविरुद्धच्या मॅच-अपसाठी ऑफ-स्पिनर हवा आहे. याच कारणामुळे, न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी सुंदरच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली. बिश्नोईने यापूर्वी २ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. ११ महिन्यानंतर टीम इंडियात संधी मिळाल्यावर त्याने आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून दिली आहे. पण वॉशिंग्टन सुंदर हाच अजूनही टीम इंडियाची पहिली पसंती आहे. कारण तो फलंदाजीतही उपयुक्त ठरतो. त्यामुळेच भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपर्यंत तरी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात अन्य खेळाडूच्या नावाची घोषणा करणार नसल्याचे दिसते. पण १५ फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीत कायम राहिली तर मात्र रवी बिश्नोई हा टी-२० वर्ल्ड कप संघाचा भाग होईल, असे चित्र दिसते.
T20 वर्ल्ड कप २०२६ साठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (विकेटकीपर)