Join us

IPL 2020साठी विराट कोहली तयारीला लागला, शेअर केला फोटो

न्यूझीलंड दौऱ्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या मैदानापासून दूरच आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 19:30 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाच्या तयारीला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटला ब्रेक लागला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात  कोहली अखेरचा खेळला होता. त्यानंतर तो लॉकडाऊनमुळे घरीच आहे. आता आयपीएल होणार असल्यानं कोहली सज्ज झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचा कर्णधार कोहलीनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून तसे संकेत दिले आहेत.  

दंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डानंही लीग खेळण्यासाठी तयारी दर्शवली आहे. आता फक्त केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे आणि रविवारी होणाऱ्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत त्याबाबतची घोषणा करण्यात येईल. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचा 13 वा मोसम सुरू होणार असल्याची घोषणा गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केली होती. 

Good News : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार बनला बाबा

कोहलीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. त्यात RCBचे क्रिकेट किट दिसत आहेत. 

आयपीएलनंतर टीम इंडियाचे खेळाडू यूएईहून थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे टीम इंडिया चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी म्हणाला...

 

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली