Team India test player Abhinav Mukund and Aarabhi blessed a baby boy | Good News : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार बनला बाबा

Good News : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार बनला बाबा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं गुरुवारी गोड बातमी दिली. हार्दिक अन् त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. हार्दिकला पुत्ररत्न झाल्याचे कळताच क्रीडा विश्वातील अनेकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. शनिवारी टीम इंडियाच्या आणखी एका शिलेदाराच्या घरी पाळणा हलला. भारताकडून   कसोटी सामना खेळणाऱ्या फलंदाजानं सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली. 

हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी म्हणाला...

हार्दिक आणि नताशा यांनी गुरुवारी मुलगा झाल्याची बातमी दिली. त्यानंतर शनिवारी भारताचा आणखी एक फलंदाज बाबा बनला आहे. शनिवारी सकाळी त्याला पुत्ररत्न झाला. त्यानं पोस्ट लिहिली की,''आराभी आणि मी पालक म्हणून आजपासून नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज सकाळी आमच्या आयुष्यात इवल्याशा पावलांनी प्रवेश केला.''


भारताकडून 7 कसोटी सामने खेळणाऱ्या अभिनव मुकूंदनं ही गोड बातमी दिली. तामीळनाडूच्या या फलंदाजानं 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघातून पदार्पण केलं होतं. 7 सामन्यांत त्यानं 321 धावा केल्या. तामिळनाडूकडून प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 145 सामन्यांत 10258 धावा आहेत. त्याच्या नावावर तिहेरी शतकही आहे. 
 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Team India test player Abhinav Mukund and Aarabhi blessed a baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.