Hardik Pandya-Natasa Stankovic became parents; Actress's ex boyfriend Ali Goni comment goes viral | हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी म्हणाला...

हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी म्हणाला...

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं गुरुवारी गोड बातमी दिली. हार्दिक अन् त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. हार्दिकला पुत्ररत्न झाल्याचे कळताच क्रीडा विश्वातील अनेकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स आदी सर्वांनी हार्दिक-नताशा यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनंही प्रतिक्रिया दिली. 

हार्दिकनं  2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. शिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले.  मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे.   

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड गोनीसोबत सहभाग घेतला होता. हार्दिकच्या गोड बातमीनंतर गोनीनं लिहिलं की,''अरे आई बनलीस.'' नताशानं त्याची ही कमेंट तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hardik Pandya-Natasa Stankovic became parents; Actress's ex boyfriend Ali Goni comment goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.