MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 04:17 PM2020-08-01T16:17:22+5:302020-08-01T16:18:27+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni past his best, has lost a bit of fitness: Former Team India all-rounder ahead of IPL 13 | MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल 2020) टीम इंडियात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पण, धोनीनं आता युवा खेळाडूंसाठी संघातील जागा रिक्त करायला हवी, त्याचा फिटनेस पहिल्यासारखा राहिलेला नाही, असा दावा भारताचे माजी निवड समिती सदस्य रॉजर बिन्नी यांनी केला आहे. 

जुलै 2019मधील वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007मध्ये ट्वेंटी-20 आणि 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला, शिवाय 2013मध्ये टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीही उंचावली. पण, युवा खेळाडू आता टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी दरवाजावर उभे आहेत आणि धोनीनं त्यांच्यासाठी जागा रिक्त करावी. तो पहिल्या सारखा सर्वोत्तम खेळाडू राहिलेला नाही आणि त्याच्या तंदुरुस्तीवर विश्वास ठेवणं व्यर्थ आहे, असेही बिन्नी यांनी सांगितले.

स्पोर्ट्सक्रीडाशी बोलताना बिन्नी म्हणाले,''मागील काही वर्षांचे क्रिकेट मोसम पाहिले, तर धोनीचे अच्छे दिन गेल्याचे दिसून येते. ताकद आणि समजुतदारपणानं सामना खेचून आणण्याची क्षमता धोनी गमावून बसला आहे. तसंच युवा खेळाडूंचे मनोधेर्य उंचावण्याची कलाही त्यात राहिली नाही.'' 2012मध्ये बिन्नी टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य होते. तेव्हाच धोनीला संघाचे कर्णधारपद मिळालं होतं.  

धोनीनं 90 कसोटीत 4876 धावा आणि 350 वन डेत 10773 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 98 ट्वेंटी-20 सामने आहेत आणि 1617 धावा आहेत. आयपीएलमध्ये त्यानं 190 सामन्यांत 4432धावा केल्या आहेत. 2015मध्ये त्यानं कसोटी क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

Web Title: MS Dhoni past his best, has lost a bit of fitness: Former Team India all-rounder ahead of IPL 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.