Join us

Virat Kohli Style: विराट कोहलीचा 'अतरंगी' अवतार! Ranveer Singh - Suryakumar Yadav ने केल्या भन्नाट कमेंट्स

विराट त्याच्या स्टायलिश लूकसाठी कायमच चर्चेत असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:52 IST

Open in App

Virat Kohli Style: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवचे विराट कोहलीने कौतुक केले होते. कोहलीने सूर्याच्या (Suryakumar Yadav) फलंदाजीची तुलना 'व्हिडिओ गेम'मधल्या खेळीशी केली होती. विराट कोहलीची ती पोस्ट चांगलाच व्हायरल झाली होती. त्यानंतर विराट कोहलीने त्याचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्या पोस्टवर अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दोघांनी केलेली कमेंट्स चांगल्याच भाव खाऊन गेल्या.

विराट कोहलीने मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये विराट कोहलीने रंगीत पोलो नेक टी-शर्ट घातला आहे. हा टी-शर्ट रंगीबेरंगी आहे. या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहेत. पण या फोटोवर करण्यात आलेल्या दोन कमेंट्स चांगल्याच भाव खाऊन गेल्या. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या या फोटोवर, बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'चिते की चाल और बाज की नजर', अशी कमेंट केली आणि हसण्याचा स्माइली पोस्ट केला. तर रंगीबेरंगी कपड्यांच्या फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंगनेदेखील इंद्रधनुष्याचे इमोजी टाकत त्या फोटोवर कमेंट केली.

दरम्यान, विराट कोहलीने २० नोव्हेंबरला सूर्यकुमार यादवची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये विराट कोहलीने लिहिले की, न्युमरो उनो (महान खेळाडू) याने दाखवून दिले की तो जगातील सर्वोत्तम फलंदाज का आहे. फलंदाजी करताना आपण पाहत होतोच. मला खात्री आहे की ही खेळी त्याच्यासाठी आणखी एक 'व्हिडिओ गेम खेळी' होती.

टॅग्स :विराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवरणवीर सिंगइन्स्टाग्राम
Open in App