Join us  

ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

ICC Test Ranking : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 2:39 PM

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीतील अव्वल स्थान गमावल्यानंतर मंगळवारी कोहलीला आणखी एक धक्का बसला. आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं 911 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. पण, कोहलीसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि टीम इंडियाचा मयांक अग्रवाल यांनाही फटका बसला आहे.

कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत मालिकेत 38 धावा करता आल्या. पहिल्या कसोटीनंतर कोहली 906 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. स्मिथ 911 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. पण, मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत कोहलीनं दुसरं स्थान कायम राखले असले तरी त्याला 20 गुणांचा फटका बसला आहे. त्याच्या गुणांची संख्या 906 वरून 886 झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 827 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं केन विलियम्सनला ( 813) चौथ्या स्थानावर ढकलले. 

पाकिस्तानचा बाबर आझम ( 800), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर  ( 793) हे अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. भारताच्या चेतेश्वर पुजारानं दोन स्थानांच्या सुधारणेसह ( 766) सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यानंतर इंग्लंडचा जो रूट ( 764), भारताचा अजिंक्य रहाणे ( 726) आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स ( 718) यांचा क्रमांक येतो. मयांक अग्रवाल टॉप टेनमधून बाहेर गेला आहे.

जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत साजेशी कामगिरी करता आली नसली तरी त्यानं चार स्थानांच्या सुधारणेसह 7व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 779 गुण झाले आहेत. टीम साऊदीही चौथ्या स्थानी आला आहे, तर ट्रेंट बोल्ट टॉप टेनमध्ये परतला आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विन टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे.

सलग तीन षटकार लगावणाऱ्या फलंदाजांत कोण आहे टॉप, तुम्हाला माहित्येय?

इंग्लंडचे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर प्रतिस्पर्धींशी हात मिळवणार नाही, कारण वाचून बसेल धक्का 

'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ

टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीजसप्रित बुमराहमयांक अग्रवालआर अश्विन