Join us

कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

वनडे मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याआधी किंग कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील किंग ठरलाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:40 IST

Open in App

Virat Kohli  Record : क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली हा मैदानात उतरला की, काही ना काही रेकॉर्ड नोंदवत असतो. पण आता मैदानाबाहेर असतानाही त्याने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातलीये. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याशिवाय इंग्लंड दौऱ्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो फक्त वनडे खेळताना दिसणार आहे. क्रिकेटच्या दोन प्रकारातून निवृत्ती घेतल्यावरही तो तिन्ही फॉरमॅटमधील किंग ठरला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ICC क्रमवारीतील तिन्ही प्रकारात ९०० + रेटिंग प्राप्त करणारा पहिला फलंदाज

विराट कोहलीनं २०१४ मध्ये ८९७ गुणांसह टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च रेटिंग मिळवली होती. टी-२० क्रमवारीतील सिस्टीम अपडेट झाल्यानंतर कोहलीची बेस्ट रेटिंग ८९७ ऐवजी ९०९ झाली आहे. या बदलासह कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ९०० पेक्षा अधिक गुण मिळवणारा क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरला आहे. २०१८ मध्ये कोहलीनं कसोटी क्रमवारीत ९११ गुण आणि वनडेत ९३७ गुण अशी सर्वोच्च रेटिंग मिळवली होती.

ENG W vs IND W 1st ODI : दीप्तीची विक्रमी खेळी! टीम इंडियाची वनडे मालिकेत विजयी सलामी

टी-२० मध्ये फक्त दोन भारतीयांना जमलीये ही कामगिरी

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत ९०० पेक्षा अधिक रेटिंग प्राप्त झालेला कोहली हा सूर्यकुमार यादवनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या यादीत डेविड मलान सर्वात आघाडीवर असून पाकिस्तानचा बाबर आझमही आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये सामील आहे.

टी-२० मध्ये ९०० प्लेस रेटिंग पॉइंट्स मिळवणारे फलंदाज 

  • डेविड मलान (इंग्लंड) - ९१९ रेटिंग पॉइंट्स
  • सूर्यकुमार यादव (भारत) - ९१२ रेटिंग पॉइंट्स
  • विराट कोहली (भारत) - ९०९ रेटिंग पॉइंट्स
  • अ‍ॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - ९०४ रेटिंग पॉइंट्स
  • बाबर आझम (पाकिस्तान) - ९०० रेटिंग पॉइंट्स

किंग कोहली कधी उतरणार मैदानात?

टी-२० आणि कसोटीतील निवृत्तीनंतर विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसू शकतो. भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे खेळणार आहे. कोहलीचा कदाचित हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौराही ठरू शकतो. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआयसीसीसूर्यकुमार अशोक यादव