Video: इशान किशनने केली विराटच्या चालण्याची नक्कल, नंतर किंग कोहलीने काय केलं पाहा...

Asia Cup 2023: विजयानंतर दिसली टीम इंडियाची मैदानातील मजा-मस्ती, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:51 PM2023-09-18T12:51:44+5:302023-09-18T12:52:25+5:30

whatsapp join usJoin us
Video Ishan Kishan imitates Virat Kohli walk then Kohli responds after India Asia Cup triumph | Video: इशान किशनने केली विराटच्या चालण्याची नक्कल, नंतर किंग कोहलीने काय केलं पाहा...

Video: इशान किशनने केली विराटच्या चालण्याची नक्कल, नंतर किंग कोहलीने काय केलं पाहा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ishan Kishan Virat Kohli, viral video: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची गणना क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. तो 15 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. यानंतरही विराट युवा खेळाडूंसोबत मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. एक-दोन वर्षापूर्वी पदार्पण केलेले युवा खेळाडूही विराटसोबत धमाल मस्ती करताना खूप कम्फर्टेबल दिसतात. असाच एक उदाहरण 2023च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर पाहायला मिळाले.

ईशानने केली विराटची नक्कल, मग किंग कोहलीने केली धमाल

भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप 2023चे विजेतेपद पटकावले. विराट कोहली सोबत इशान किशन, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा उभे होते. त्यानंतर ईशानने विराट कोहलीची नक्कल करण्यास सुरुवात केली. तो विराटसारखा वागू लागला. यावेळी कोणालाही हसू आवरलं नाही. यानंतर विराटनेही इशानच्या चालण्याची नक्कल केली आणि सगळे हसायला लागले. पाहा धम्माल व्हिडीओ-

आठव्यांदा जिंकला आशिया कप

भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ सलग दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटचा चॅम्पियन बनला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ भारतासमोर टिकू शकला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजच्या धारदार गोलंदाजीसमोर संघाचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताने हे लक्ष्य अवघ्या 37 चेंडूत पूर्ण केले. सिराजने 21 धावांवर श्रीलंकेच्या 6 बळी घेतले. त्याला सामनावीराचा किताब मिळाला.

Web Title: Video Ishan Kishan imitates Virat Kohli walk then Kohli responds after India Asia Cup triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.