Join us

Axar Patel Marriage: नुकतेच लग्न झालेल्या अक्षर पटेलची पत्नी आहे तरी कोण?; Instagramवरील रिल्सची रंगली चर्चा

भारतीय संघाचा खेळाडू अक्षर पटेल याने प्रियसी मेहा पटेलसोबत काल लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 09:33 IST

Open in App

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जानेवारीला सलामीवीर केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. आता त्याच्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही लग्नगाठ बांधली आहे. अक्षरने त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्न केले आहे. 

अक्षर पटेलचे गुरुवारी (२६ जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. अक्षरच्या मिरवणुकीचा व्हिडिओही समोर आला आहे. अक्षरची वरात घोड्यावरून न निघता कारमधून निघाली. त्याच्यासोबत कुटुंबीयदेखील कारमध्ये बसलेले दिसले. अक्षर आणि मेहाच्या मेंदी आणि हळदीचा विधीही झाला. त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. क्रिकेटर जयदेव उनाडकटही या सोहळ्यास हजर होता.

अक्षर पटेल आणि मेहा पटेल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि याच काळात ते खूप जवळही आले होते. आता दोघेही लग्न करणार आहेत. अक्षरची भावी पत्नी मेहा पटेल ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. ती न्यूट्रीशनिस्ट देखील असून मेहा पटेलने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. 

मेहाने तिच्या हातावर अक्षरच्या नावाने टॅटू देखील बनवला आहे. तसेच मेहाला रील्स बनवण्याची खूप आवड आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत रील शेअर करत असते. मेहाचे २७ हजार फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी२० आणि वन डे मालिका खेळली होती. त्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंड विरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.

टॅग्स :अक्षर पटेललग्नइन्स्टाग्राम
Open in App