ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या टिकटॉक व्हिडीओ करून सर्वांचे मनोरंजन करत आहे. मैदानावर आपल्या आक्रमक फटकेबाजीनं ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नरचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओंना नेटिझन्सकडूनही भरभरून प्रेम मिळत आहेत. तो एकटाच नव्हे तर त्याचे कुटुंबीयही टिकटॉक व्हिडीओत त्याला साथ देत आहेत. बॉलिवूड, टॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही वॉर्नरचे कौतुक केले आहे. पण, हाच वॉर्नर एका डान्सरच्या प्रेमात पडला आहे आणि त्यानं त्याचे कौतुक करणारा टिक टॉक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे.
वॉर्नरनं शेअर केलेला व्हिडीओ हा अरमान राठोडचा आहे. वॉर्नरनं लिहिलं की,''अरमान राठोड तुझा डान्स कमाल आहे.''
अरमानच्या डान्सचे कौतुक प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजा, अभिनेता
रितेश देशमुख यानेही शेअर केला आहे.
MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट
Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!
OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!