Asia Cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी आज कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ ६ दिवसांपासून बंगळुरू येथे सराव करतोय. दुखापतीतून सावरणारे लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी सराव सत्रात चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते, परंतु KL Rahul पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नसल्याचे अपडेट्स मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी दिले आहेत. त्यामुळे इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास पक्के आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.