Asia Cup UAE vs Oman 7th Match, Muhammad Waseem Fastest 3000 Runs Record In T20I : संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार मुहम्मद वसीम (Muhammad Waseem) याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. आशिया चषक स्पर्धेतील ओमान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह त्याने T20I मध्ये ३००० धावांचा पल्ला पार केला. टी-२० जगतात सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठत त्याने इंग्लंडचा स्फोटक बॅटर जोस बटलरला मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
UAE कर्णधारानं ओमानविरुद्ध ठोकली कडक फिफ्टी
आशिया चषक स्पर्धेतील ओमान विरुद्धच्या लढतीत कर्णधाराने जबरदस्त खेळीचा नजराणा पेश करताना १२७.७८ च्या स्ट्राईक रेटने ५४ चेंडूत ६९ धावांची दमदार खेळी केली. त्याची ही खेळी ६ चौकार आणि ३ षटकाराने बहरलेली होती. अखेरच्या षटकात धावबादच्या रुपात त्याने आपली विकेट गमावली. पण त्याआधी त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला होता.
IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड
कमी चेंडूत ३००० धावांचा डाव साधत सेट केला खास विक्रम
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलदगतीने (चेंडूच्या बाबतीत) ३,००० धावांचा टप्पा पार करताना त्याने जोस बटलरला मागे टाकले. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या UAE च्या बॅटरनं १,९४७ चेंडूंचा सामना करताना हा डाव साधला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरच्या नावे होता. त्याच्यापेक्षा १२१ चेंडू कमी खेळत मुहम्मद वसीम याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. या यादीत अॅरॉन फिंच (२,०७७ चेंडूत), डेविड वॉर्नर (२,११३ चेंडूत) आणि रोहित शर्मा (२,१४९) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
सर्वात कमी डावात ३००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या यादीत अव्वल कोण?
मुहम्मद वसीम याने ८४ डावात ३००० धावांचा पल्ला गाठला आहे. डावाचा विचार करता सर्वात जलद ३००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा अव्वलस्थानावर आहे. त्याने ७९ डावात ही कामगिरी केली होती. त्यापाठोपाठ बाबर आझम आणि विराट कोहलीचा नंबर लागतो. दोघांनी ८१ डावात हा डाव साधला होता.
Web Title: United Arab Emirates Captain Muhammad Waseem Became Fastest By Balls To 3,000 T20I Runs Scoring 69 Against Oman In 2025 Asia Cup Surpassing Jos Buttler
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.