महिला प्रीमियर लीग (WPL 2026) स्पर्धेच्या चौथ्या हंगामाची सुरुवात अगदी दिमाखदार अंदाजात झाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीच्या लढतीआधी नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांचा जलवा पाहायला मिळाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यो यो हनी सिंगच्या त्या कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृती गोंधळली
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांचा हनी सिंगसोबतचा एक खास व्हिडिओ WPL च्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हनी सिंगच्या एका कृतीनंतर दोघीही गोंधळलेल्या दिसल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
WPL मधील MI ची स्टार खेळाडू फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळेही राहिलीये चर्चेत
नेमकं काय घडलं?
जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्यात रॅपर हनी सिंग हा डगआउटमधील चेअरवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या मधोमध बसल्याचे पाहायला मिळते. गाणे गात गात तो चेअरवरुन उठल्यावर दोन्ही कर्णधार आपल्या चेअरवरुन उठल्या. नेमकं काय करायचं असा गोंधळ दोघींच्या मनात निर्माण झाला. MI ची कर्णधार हमनप्रीत कौरनं गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला स्मृती मानधना आधी हाताची घडी घालून शांत उभी राहिल्याचे दिसले. त्यानंतर तिनेही हरमनप्रीत कौरला फॉलो करत टाळ्या वाजत हनी सिंगच्या गाण्याला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. WPL च्या उद्घाटन समारंभाची सुरुवात हरनाझ कौर संधूच्या परफॉर्मन्सने झाली. त्यानंतर जॅकलीन फर्नांडिसन आपल्या ठुमक्यांनी मैफीलत रंग भरला. हनी सिंग आणि दोन्ही संघातील कर्णधारांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
MI सर्वात यशस्वी संघ, RCB नंही जिंकली आहे WPL ट्रॉफी
भारतीय संघाची महिला संघाची कर्णधार आणि उप कर्णधार यांच्या नेतृत्वाखालील लढतीनं चौथ्या हंगामाची अगदी दिमाखदार सुरुवात झाली आहे. पहिल्या हंगामासह गत हंगामात हमरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याशिवाय स्मृतीच्या नेतृत्वाखालील RCB च्या संघाने २०२४ चा हंगाम गाजवला होता. यंदाच्या हंगामात या दोन संघाचा दबदबा कायम राहणार? की नवा चॅम्पियन मिळणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : During the WPL opening, Honey Singh's actions left Harmanpreet and Smriti puzzled. The video shows them reacting to his performance. Mumbai Indians and RCB started the season.
Web Summary : डब्ल्यूपीएल के उद्घाटन के दौरान हनी सिंह की हरकतों ने हरमनप्रीत और स्मृति को हैरान कर दिया। वीडियो में उनकी प्रतिक्रिया दिखाई गई है। मुंबई इंडियंस और आरसीबी ने सीजन की शुरुआत की।