टिकटॉकवर (TikTok) काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारा हा व्हिडीओ आहे. लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे चाहते काहीसे निराश आहेत. पण, टिकटॉकवरील हा व्हिडीओ त्यांना आनंद आणि तितकाच आश्चर्यचकीत करणारा ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच असा शॉट कोणी मारला आहे. एबी डिव्हिलियर्सला Mr 360 असे संबोधले जात असले तरी त्यालाही असा षटकार खेचणे अवघडच दिसत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं पुन्हा एकदा तो अतरंगी षटकार मारणाऱ्या खेळाडूचा व्हिडीओ शेअर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा षटकार कोण मारू शकेल, असा सवालही चोप्रानं केला.
गल्ली क्रिकेटचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मुलग्याने मारलेला शॉट काहीतरी भलताच आहे. त्यानं मागे वळून षटकार खेचला आहे. त्याचा हा शॉट पाहून त्याच्याबरोबर खेळणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. गोलंदाजानं फलंदाजाच्या पायाजवळ बॉल टाकला. मात्र त्यावर फटका मारण्यासाठी फलंदाज मागे वळून जोरदार छक्का मारतो. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
आकाश चोप्रानंही त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा षटकार कोण मारेल,असा सवाल केला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शिखर धवनच्या मुलाला चाहत्यानं म्हटलं 'Black'; पत्नी आयशानं दिलं सडेतोड उत्तर
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 13 वर्ष; पहिली सहा वर्ष ठरला फ्लॉप, पण आज थरथर कापतात गोलंदाज!
'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी जग आतुर; शोएब मलिकचा दावा
कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!
घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत
हरभजन सिंगनं शेअर केला मजेशीर फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का खेळाडू?