Join us  

U19WC : माकडानं केला हल्ला अन् ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजानं घेतली वर्ल्ड कपमधून माघार

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 2:33 PM

Open in App

क्रिकेट वर्ल्ड कप म्हटलं की ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी आलीच... पण, 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. पण, या धक्क्यापेक्षा अधिक मोठी घटना ऑसी संघांबरोबर घडली आहे. त्यांचा स्टार फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगुर्क यानं स्पर्धेतूनच माघार घेतली आहे. फ्रेझर-मॅकगुर्कच्या माघारीला कारण माकड ठरलं आहे... होय होय माकडं...

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर राखीव दिवशी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय उद्यानात गेले होते. तेव्हा तेथे त्याच्यावर माकडानं हल्ला केला. त्यात जखमी झाल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यात आता फ्रेझर- मॅकगुर्क खेळणार नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की,''ही घटना घडल्यानंतर सात दिवसांच्या आत फ्रेझर-मॅकगुर्कवर उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्पर्धेतील अंतिम दोन सामन्यात तो खेळणार नाही आणि तो  मायदेशी परतणार आहे.''

भारताविरुद्धच्या सामन्यात फ्रेझर-मॅकगुर्क पहिल्याच षटकात तो एकही चेंडू न खेळता धावबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण, त्यांना आता पुढील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या क्रमवारीसाठी दोन सामने खेळावे लागतील.     

पाकिस्तानचा गोलंदाज म्हणतो, IPL जगातील अव्वल ट्वेंटी-20 लीग, पण...

IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर

IND Vs NZ, 3rd T20I : टीम इंडियाच्या 'Super' विजयावर बिग बी अन् वीरूचं खास ट्विट

Video : न्यूझीलंड संघाची खिलाडूवृत्ती; जखमी प्रतिस्पर्धी फलंदाजाला उचलून नेलं मैदानाबाहेर

Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!

OMG : असा चमत्कार पुन्हा होणे नाही; 32 चेंडूंत 1 धाव अन् 7 विकेट्स, पाहा Video

टीम इंडियाच्या 'या' सुंदरीची सोशल मीडियावर चर्चा... कोण आहे ती?

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाइंग्लंडद. आफ्रिकामाकडभारतीय क्रिकेट संघ