Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:37 AM2020-01-30T11:37:35+5:302020-01-30T11:48:18+5:30

Kobe Bryant : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट याचा सोमवारी मृत्यू झाला.

an interview with Kobe Bryant, he explained the reason why the helicopter traveled daily | Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!

Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!

Next

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटूकोबे ब्रायंट याचा सोमवारी मृत्यू झाला. कॅलिफोर्नियाच्या कॅलाबॅससमध्ये झालेल्या या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश होता. बास्केटबॉल जगतातील एक दिग्गज खेळाडू अशी ओळख असलेल्या ब्रायंटच्या निधनाने जग हादरले होते. मात्र कोबे ब्रायंटचा एक जूना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोबेने खासगी हेलिकॉप्टरने रोज प्रवास का करायचा  याबाबत खुलासा केला होता.

दिग्गज बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

माजी बास्केटपटू रेक्स चॅपमन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका मुलाखतीत लॉस एंजलिसच्या आसपास फिरताना हेलिकॉप्टर का वापरायचा याचे कारण खुद्द कोबेने दिले सांगितले होते. मला माझ्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी मी हेलिकॉप्टर वापरतो. तसेच लॉस एंजलिसमध्ये प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोडींचा सामना करावा लागतो. मी शाळेत असतानाही मला वाहतुक कोंडीमुळे अनेकदा खेळण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे वाहतुक कोडींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मुलांना जास्तीत जास्त खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी मी हेलिकॉप्टर वापरण्याचा निर्णय घेतला असे कोबे ब्रायंटने या मुलाखतीत सांगितले होते. 

लॉस एंजलिसपासून 65 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचं होतं. हवेत हेलिकॉप्टरला आग लागून ते झुडपात कोसळले होते.  कोबे ब्रायंट हा 20 वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये सक्रिय होता. या काळात त्याने पाच चॅम्पियनशीप जिंकल्या. तसेच 18 वेळा कोबे ब्रायंटला 'एनबीए ऑल स्टार' ने गौरवण्यात आले होते. 

कोबे ब्रायंट याच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शोक व्यक्त केला आहे. 'कोबे ब्रायंट, जगातील ग्रेट बास्केटबॉलपटू असून त्याने नुकतीच आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होतं.' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

बराक ओबामा यांनीह ब्रायंटच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत 'कोबे ब्रायंट महान होता आणि आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत होता. पालक म्हणून गियानाचा मृत्यू ही आमच्यासाठी दु:खद घटना आहे. मिशेल आणि मी ब्रायंट कुटुंबाचं सांत्वन असे सांगितले.

Web Title: an interview with Kobe Bryant, he explained the reason why the helicopter traveled daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.