टीम इंडियाच्या 'या' सुंदरीची सोशल मीडियावर चर्चा... कोण आहे ती?

भारतीय महिला क्रिकेट संघातील एक खेळाडू सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगमध्ये आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी या खेळाडूची संघात निवड झाली नसली तरी तिच्या सुंदरतेनं नेटिझन्सवर भुरळ घातली आहे.

भारतीय महिलांच्या वन डे संघात बदली सलामीवीर म्हणून आलेल्या या खेळाडूनं आपलं स्थान मजबूत केलं. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिनं अर्धशतकी खेळी करताना इतिसाह घडवला.

प्रिया पुनिया असं या खेळाडूचे नाव आहे. 23 वर्षीय प्रियानं पदार्पणात वन डे सामन्यात अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारी ती सातवी भारतीय महिला फलंदाज ठरली.

6 ऑगस्ट 1996 मध्ये प्रियाचा जन्म झाला आणि वयाच्या 7व्या वर्षापासून तिनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

मुलगी असल्यानं तिला क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा तिच्या वडीलांनी राहतं घर विकून तिच्यासाठी सरावाचं मैदानच तयार केले.

तिनं दिल्लीतील जीजस अँड मेरी कॉलेजमधून कॉमर्समधून पदवी घेतली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे तिही अंधश्रद्धाळू आहे आणि म्हणूनच ती प्रथम डाव्या पायातील पॅड घालते.

दी वॉल राहुल द्रविडचा खेळ पाहून ती लहानाची मोठी झाली आणि ती विराट कोहलीला आदर्श मानते. 6 फेब्रुवारी 2019मध्ये तिनं न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

महिलांच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता. क्रिकेट व्यतिरिक्त प्रियाला बॅडमिंटन आणि टेनिस खेळायलाही आवडते.

प्रियानं पाच वन डे सामन्यांत 43.75 च्या सरासरीनं 175 धावा केल्या आहेत. नाबाद 75 ही तिची सर्वोत्तम खेळी आहे.