ACC U 19 Women's T20 Asia Cup , Indian Team Defeated Pakistan : क्रिकेट प्रेमींसाठी १५ डिसेंबर हा सुपर संडे आहे. सकाळच्या सत्रात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना, दुपारच्या सत्रात वुमन्स प्रीमिअर लीग मिनी लिलाव आणि अंडर १९ महिला आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना आणि संध्याकाळच्या सत्रात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील फायनलची लढत रंगणार आहे. देशांतर्गत स्पर्धेल निकालाआधी अंडर १९ वुमन्स आशिया कप स्पर्धेतील निकाल लागला. या स्पर्धेत १९ वर्षाखालील भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला.
भारतीय संघानं ४७ चेंडूत जिंकला सामना
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे १९ वर्षाखालील अंडर-१९ वुमन्स आशिया कप २०२४ स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संगानं पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला निर्धारित २० षटकांत ७ बाद ६७ धावांत रोखले. त्यानंतर भारतीय महिला संघाने हे अल्प आव्हान ९ विकेट्स राखून फक्त ७.५ षटकात पार केले.
पाक संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात केल्या फक्त ६७ धावा
पाकिस्तान अंडर-१९ महिला क्रिकेट संघाची कॅप्टन जूफिशान अयाज हिने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या युवा महिला संघानं भारतीय गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. भारताकडून सोनम यादव हिने ४ षटकात ६ धावा खर्च करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून सलामीची बॅटर कोमल खान हिने सर्वाधिक २४ धावा केल्या.
कमालिनीची कमाल; २९ चेंडूत कुटल्या ४४ धावा