india vs pak a asia cup 2024 : १८ तारखेपासून इमर्जिंग आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. गतवर्षी अंतिम सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते. पाकिस्तान अ संघाने तब्बल १२८ धावांनी टीम इंडियाचा पराभव करत किताब उंचावला होता. त्यामुळे आता शेजाऱ्यांना अस्मान दाखवून भारताची युवासेना पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल. या स्पर्धेत तिलक वर्मा भारतीय संघाचे नेृतृत्व करत आहे, तर अभिषेक शर्मावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून सामन्याचा थरार रंगेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, आणि फॅन कोड ॲपवर चाहत्यांना ही लढत लाईव्ह पाहता येईल.
भारताचा संघ -
तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, निशांत सिंधू, रमनदीप सिंग, नेहाल वढेरा, आयुष बदोनी, अनुज रावत, साई किशोर, हृतिक शौकीन, राहुल चाहर, वैभव अरोरा, अंशुल कंबोज, Aquib Khan, रासिक सलाम.
अ गटातील संघ - भारत अ, ओमान, पाकिस्तान, यूएई.
ब गटातील संघ - अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, हाँगकाँग, श्रीलंका अ.
भारताचे सामने -
१९ ऑक्टोबर २०२४ - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ
२१ ऑक्टोबर २०२४ - भारत अ विरुद्ध यूएई
२३ ऑक्टोबर २०२४ - ओमान विरुद्ध भारत अ
२५ ऑक्टोबर - उपांत्य फेरी १, अ गटातील अव्वल विरुद्द ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
२५ ऑक्टोबर - उपांत्य फेरी २, ब गटातील अव्वल विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमाकांचा संघ
२७ ऑक्टोबर - अंतिम सामना
(सर्व सामने ओमान क्रिकेट अकादमी मैदान, मस्कत येथे होतील)