Join us  

जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!

भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती.

By स्वदेश घाणेकर | Published: June 24, 2021 1:34 PM

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाचे सपोर्टर असलात तरी मनाचा एक कोपरा न्यूझीलंडच्या बाजूनं होताकेन विलियम्सन किवी कर्णधार असला तरी तो सर्वांना आपलासाच वाटतो

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर न्यूझीलंड संघानं मोठ्या ऐटीत नाव कोरलं... भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती. त्यामुळे भारतीयांनी विराट कोहली अँड टीमला विजेत्याच्या रुपात पाहायला सुरुवात केली होती. पण, बुधवारी साऊदॅम्प्टन येथे सुर्योदय झाला, तो न्यूझीलंडच्या विजयाचा निर्धार पाहू अजून लख्ख प्रकाश देत राहिला.. पहिला व पाचवा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात आघाडी घेताना पाहून सहाव्या दिवशी पाऊस नको, अशी प्रार्थना करणारे भारतीय अचानक सामन्याचे चित्र बदलल्यानंतर वरुणराजाला हाक मारू लागले... न्यूझीलंडच हा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा खरा मानकरी आहे, हे मनोमन भारतीयांनाही माहित होतं अन् खऱ्या क्रिकेटप्रेमीच्या मनातही तिच इच्छा होती... WTC Final 2021, WTC Final 2021

५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

२०१५ व २०१९च्या वर्ल्ड कपनं न्यूझीलंडला जेतेपदापासून दूर ठेवले. त्यात २०१९चा वर्ल्ड कप हा कागदोपत्री इंग्लंडच्या नावावर असला तरी खरा विजेता हा किवी संघच आहे, हे आजही आणि यापुढेही क्रिकेटचाहते ठामपणे सांगतिल. कारण इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर फायनलमध्ये दोन वेळा बरोबरीत समाधान मानायला लावलं आणि फक्त चौकार कमी या निकषावर किवींना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. इंग्लंडच्या संघालाही मनोमनी वन डे वर्ल्ड कपचे जेतेपद ज्या पद्धतीनं नावावर झालं, त्याची लाज वाटत असावी. २०१९च्या त्या पराभवानंतर कोणताही संघ खचला असता, परंतु केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली हा संघ आणखी जोमानं उभा राहिला. न्यूझीलंड संघाची ती खासियतच आहे....Ind vs NZ Test Final, WTC final 2021

Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

ब्रेंडन मॅक्युलमनं या संघात आक्रमकता आणली आणि केन विलियम्सननं त्या आक्रमकतेला शालिनतेची जोड दिली. त्यामुळेच जेव्हा जेव्हा भारत-न्यूझीलंड सामना होतो, मग तो कोणत्याही फॉरमॅटचा असो, तेव्हा तेव्हा भारतीयांच्या मनाचा एक कोपरा किवींच्या बाजूनं नक्की असतो. हे या संघाचे खरे यश आहे. स्लेजिंग, आक्रसताळेपणा, अंगावर धावून जाणं हे या संघाला कधी जमलेच नाही किंबहुना त्यांना हे पटतच नाही. प्युअर क्रिकेट... हेच त्यांच्या ध्यानीमनी वसलेले आहे. त्यामुळे जे काही प्रत्युत्तर द्यायचे ते खेळातून अन् तेही कोणतीही मर्यादा न ओलांडता... वन डे वर्ल्ड कप नंतर आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली अन् जून २०१९पासून ही स्पर्धा सुरू झाली...IND vs NZ World Test Championship

 टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

भारतानं WTC मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. वेस्ट इंडिज व बांगलादेश या तुलनेनं कमकुवत संघांना त्यांनी पराभूत केलं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन इतिहास रचला. इंग्लंडचा पाहुणचार करताना ०-१ असा पिछाडीवरून ३-१ असा मालिका विजय मिळवून अंतिम सामन्यात ऐटीत प्रवेश केला. दुसरीकडे न्यूझीलंडनं पाकिस्तान, वेस्ट इंडिज, भारत यांना पराभूत केलं अन् श्रीलंकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला अन् न्यूझीलंडचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला.. पण, यामुळे त्यांची कामगिरी नजरंदाज करता येणार नाही. किवींनी जगातील सर्वोत्तम असलेल्या टीम इंडियाला व्हाईटवॉश दिला होता. पण, या विजयानंतर ते अंतिम सामन्यात गाफिल असलेले अजिबात वाटले नाही, उलट त्यांनी अधिक सावधपणा बाळगून डावपेच आखले...  

इंग्लंडची खेळपट्टी ही न्यूझीलंडसाठी पोषकच होती. त्यामुळे त्यांनी सराव नसता केला तरी त्यांचे काही बिघडले नसते. पण, त्यांनी यजमानांसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि तेथेच मानसिकरित्या त्यांनी भारतावरही विजय मिळवला. चार प्रमुख जलदगती गोलंदाज अन् एक जलदगती अष्टपैलू खेळाडूंसह केन विलियम्सननं टीम मैदानावर उतरवली अन् बाजी मारली. पहिल्या व दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना विलियम्सन कर्णधाराला साजेसा खेळला. त्यानं वैयक्तिक खेळीसह सहकाऱ्यांना सोबत घेत संघाची धावसंख्या वाढवली. पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावांची त्याची खेळी टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर कायले जेमिन्सन या ६.८ फुटाच्या गोलंदाजासमोर भारताचे दिग्गज फलंदाज ठेंगणे पडले. एक कम्प्लिट टीम परफॉरम्न्स किवींनी दिला. 

टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवूनही त्यांनी अगदी साधेपणानं जेतेपदाचा जल्लोष साजरा केला. रॉस टेलरनं खणखणीत फटका मारला अन् चेंडू सीमारेषेपार जाताच नॉन स्ट्रायकर केनकडे वळला व त्याला मिठी मारली. उगाच हवेत उड्या नाही, हातवर करून धावणे नाही. केन व रॉस हे खरे जंटलमन अन् त्यांचा विजयाचा आनंदही त्याच सारखा...

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडकेन विल्यमसन