WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:41 PM2021-06-24T12:41:24+5:302021-06-24T12:41:49+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : A country with 5 million beating a country with 1.4 Billion, Michael Vaughan congratulate NZ | WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला. न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या जेतेपदाचा मान न्यूझीलंडनं पटकावला. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना केन विलियम्सन व रॉस टेलर ही अनुभवी जोडी मैदानावर तग धरून होती. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची परिक्षा घेतली आणि ९६ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं...

Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) - २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) - १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) - २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६,  इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) - २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)  

टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

मायकेल वॉननं ट्विट केलं की, ग्रेट गेम... पाच कोटी लोकसंख्या असलेल्या देशानं १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाला पराभूत केलं. यापूर्वी न्यूझीलंड अनेकदा जेतेपदाच्या नजीक आले आणि ते सातत्यानं यशाचे शिखर सर करत होते, परंतु आता ते चॅम्पियन्स आहेत. या संघाकडे अनेक भक्कम पर्याय आहेत.वेल डन किवी 


सामन्याचा निकाल जवळ येताच वॉननं एक ट्विट केलं होतं. ''न्यूझीलंड जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणार याचं भाकीत मी आधीच केलं होतं अन् आता काही तासांत मला हजारो भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागेल, असे चित्र दिसतंय,''असे त्यानं ट्विट केलं होतं.

 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : A country with 5 million beating a country with 1.4 Billion, Michael Vaughan congratulate NZ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.