Join us
Daily Top 2Weekly Top 5

शॉट हुकला, चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला, पण फलंदाजांनी काढल्या ३ धावा, नेमकं काय घडलं? 

ICC T20 World Cup 2026, Afg Vs Canada: क्रिकेटच्या मैदानात षटकार, चौकारांच्या बरसातीसोबत अनेक गमती जमतीही घडत असतात. कधी कधी एखाद्या संघाला नशिबाची साथ लाभते तर एखाद्या संघाला किरकोळ चुकीचा फटका बसतो. असाच काहीसा अजब आणि गमतीदार प्रकार टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात झालेल्या लढतीत घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:24 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात षटकार, चौकारांच्या बरसातीसोबत अनेक गमती जमतीही घडत असतात. कधी कधी एखाद्या संघाला नशिबाची साथ लाभते तर एखाद्या संघाला किरकोळ चुकीचा फटका बसतो. असाच काहीसा अजब आणि गमतीदार प्रकार टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात झालेल्या लढतीत घडला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या डावादरम्यान, शेवटच्या षटकात एका चेंडूवर अफगाणिस्तानच्या  फलंदाजांनी तीन धावा धावून काढल्या. मात्र या तीन धावा काढताना घडलेली गंमत आता चर्चेचा विषय ठरली आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात झालेल्या साखळी लढतीत कॅनडाने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. इब्राहिम झादरान याने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानचा संघ दोनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. यादरम्यान, जसकरण सिंग याने टाकलेल्या डावातील शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा निघाल्या होत्या. जसकरणने तिसरा चेंडू स्वैर टाकल्याने अफगाणिस्तानला अवांतरच्या रूपात एक धाव मिळाली.

त्यानंतर जसकरणने पुढचा चेंडू टाकल्यावर हा अजब प्रकार घडला. त्याचं झालं असं की, जसकरणने टाकलेल्या विसाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाज  दारविश रसूली याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र रसुलीला फटका मारता आला नाही आणि चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. पण यादरम्यान नॉन स्टाईकवर असलेल्या इब्राहीम झादरान चोरटी धाव घेण्यासाठी  स्ट्राईकच्या दिशेने पळाला. त्याचवेळी कॅनडाच्या यष्टीरक्षकाने चेंडू यष्ट्यांच्या दिशेने फेकला. मात्र चेंडू यष्ट्यांवर आदळून दुसऱ्य दिशेने केला. ही संधी साधून अफगाणी फलंदाजांनी दुसरी धाव घेतली. यादरम्यान, गोंधळलेल्या कॅनडाच्या क्षेत्ररक्षकांनी आणखी एकदा नॉन स्टाईकवरच्या यष्ट्यांवर निशाणा साधला. मात्र चेंडू यष्ट्यांवर आदळून ओव्हर थ्रो झाला त्यामुळे फलंदाजांना तिसरी धाव मिळाली. अशा प्रकारे जिथे एकही धाव मिळता कामा नये होती. तिथे अफगाणिस्तानला बायच्या रूपात ३ धावा मिळाल्या.

दरम्यान, इब्राहिम झादरानच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर २०० धावांपर्यंत मजल मारणाऱ्या अफगाणिस्तानने मोहम्मद नबी आण रशिद खान यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर कॅनडाला ११८ धावांवर रोखत ८२ धावांनी मोठा विजय मिळवला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Missed Shot, Three Runs! Afghanistan's Lucky Break in T20 World Cup

Web Summary : Afghanistan scored three runs in a T20 World Cup match against Canada after a missed shot led to overthrows. A lucky break helped them reach a formidable score, securing a big win.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६अफगाणिस्तानकॅनडाटी-20 क्रिकेट