Team India’s Women Squad For ODI And T20I Series Against Australia Announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकाच वेळी दोन संघांची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडेसह टी-२० मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत हरमनप्रीत कौरच भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसेल. काही नव्या चेहऱ्यांशिवाय एका अनुभवी खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी देण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नव्या चेहऱ्यांना संधी
मागील वर्षी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात तीन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वैष्णवी शर्मा, जी कमलिनी आणि काशवी गौतम यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. उमा छेत्री, यास्तिका भाटिया आणि प्रतिका रावल यांना या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही.
Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्...
T20I संघात २ बदल
श्रीलंकेविरुद्धच्या मागील मालिकेच्या तुलनेत T20I संघात केवळ दोन बदल करण्यात आले आहेत. हरलीन देओलच्या जागी श्रेयंका पाटीलचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय भारती फुलमाली T20 संघात स्थान देण्यात आले आहे. फुलमाली हिने २०१९ मध्ये अखेरचा T20I सामना खेळला होता. जवळपास ७ वर्षांनंतर तिचे संघात पुनरागमन झाले आहे. वनडे संघात काशवी गौतमची निवड विशेष मानली जात आहे. तिला फक्त ODI संघातच स्थान देण्यात आले आहे. हरलीन देओलला वनडे संघात संधी मिळाली असून T20I संघातून तिला वगळण्यात आले आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची T20I मालिका १५ फेब्रुवारीपासून सिडनी येथे सुरू होईल. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळवली जाईल. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी ३ सामने होतील.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.
ODI मालिकेसाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल.