India vs Pakistan, ICC Annual Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष क्रिकेट संघाची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघ तीनपैकी दोन फॉरमॅटमध्ये अव्वलस्थानी आहे, तर एका फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिला नंबर पटकावला आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान वार्षिक क्रमवारीत खूपच वाईट स्थितीत आहे. पाकिस्तान संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतापेक्षा खूपच मागे आहे. मे २०२४ पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे १०० टक्के आणि गेल्या दोन वर्षातील सामन्यांचे ५० टक्के असे गुणोत्तर लक्षात घेऊन ही वार्षिक क्रमवारी तयार करण्यात आली आहे.
टीम इंडिया दोन फॉरमॅटमध्ये वरचढ
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारताने वनडे आणि टी२० स्वरूपात नंबर-१ होण्यात यश मिळवले आहे. त्याच वेळी, कसोटी विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे असल्याने ते अव्वल आहेत. वनडे क्रमवारीत ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा फायदा भारताला मिळाला आहे. यासह, त्यांचे रेटिंग गुण १२२ वरून १२४ झाले आहेत. दुसरीकडे, गतविजेता भारत टी२० मध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा भारताची आघाडी १० वरून नऊ गुणांवर आली आहे. याशिवाय, सध्याच्या विश्व कसोटी विजेत्या ऑस्ट्रेलियाने कसोटी संघ क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. नवीन अपडेटनंतर त्यांची आघाडी १५ वरून १३ गुणांवर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे १२६ रेटिंग गुण आहेत.
पाकिस्तानचा 'सुपडा साफ'
पाकिस्तानची तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप वाईट कामगिरी आहे. कसोटी क्रमवारीत पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटबद्दल तो पाचव्या स्थानावर आहे आणि टी२० मध्ये तो आठव्या स्थानावर आहे. याचा अर्थ तो कोणत्याही स्वरूपात भारताच्या जवळपासही नाही. मे २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान त्याची कामगिरी खूपच खराब आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकात ती लीग टप्प्यातून बाहेर पडली. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काहीसे दिसून आले. यजमान देश असूनही या स्पर्धेत ते लीग टप्प्यातच बाहेर पडले.