Join us
Daily Top 2Weekly Top 5

Team India T20 World Cup Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? तारीख अन् वेळ ठरली!

टी २०- वर्ल्ड कपसाठी होणाऱ्या संघ निवडीआधी शुभमन गिलसंदर्भात संभ्रम! उप कर्णधार संघाबाहेर राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:09 IST

Open in App

Team India T20 World Cup Squad Announcement Date Timing Suryakumar Yadav :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची सांगता झाल्यावर टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. आयसीसी स्पर्धेसाठी संघाची घोषणा ही महिनाभर आधी केली जाते. बीसीसीआय नेहमी शेवटच्या क्षणीच संघाची घोषणा करताना पाहायला मिळाले आहे. पण यावेळी बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेसह टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ निवडीचा निर्णय घेतला आहे. BCCI नं अधिकृत निवेदनासह यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!संघ निवडीची तारीख अन् वेळ ठरली!

बीसीसीआयच्या प्रेस नोटनुसार, BCCI वरिष्ठ पुरुष निवड समिती शनिवारी, २० डिसेंबर रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक घेणार आहे. या बैठकीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसह आणि आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ निवड करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करणार आहेत.

Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण

टी २०- वर्ल्ड कपसाठी होणाऱ्या संघ निवडीआधी शुभमन गिलसंदर्भात संभ्रम! उप कर्णधार संघाबाहेर राहणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी-२० सामना अमहादाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी शुभमन गिल दुखापतीची बातमी समोर आली आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसह आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला टी-२० संघात संधी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाकडे संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांच्या रुपात तगडे पर्याय उपलब्ध आहेत. १५ सदस्यीय संघात BCCI कुणाला संधी देणार ते पाहण्याजोगे असेल. 

वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारत- न्यूझीलंड यांच्यात रंगणार द्विपक्षीय टी-२० मालिका 

भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावाधीत टी- २० वर्ल्ड कप स्पर्धे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची द्विपक्षीय टी-२० मालिका खेळताना दिसेल. २१ जानेवारी ते ३१ जानेवारी, २०२६ या कालावधीत ही मालिका खेळवण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Team India's T20 World Cup Squad Announcement: Date and Time Fixed!

Web Summary : Team India's T20 World Cup squad will be announced on December 20th at 1:30 PM after a BCCI meeting. Chief selector Ajit Agarkar and captain Suryakumar Yadav will reveal the team. Doubts surround Shubman Gill's participation due to injury, while India will play a T20 series against New Zealand before the World Cup.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवअजित आगरकरशुभमन गिलबीसीसीआय