Join us

India Squad For ICC Women's World Cup 2025 : 'लेडी सेहवाग'वर भरवसा नाय! वर्ल्ड कपसाठी असा आहे भारतीय संघ

Team India Squad For ICC Women's Cricket World Cup 2025 :

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:25 IST

Open in App

Team India Squad For ICC Women's Cricket World Cup 2025  : आशिया कप स्पर्धेसाठी पुरुष संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय महिला संघाच्या निवड समितीच्या प्रमुख नीतू डेविड यांनी हरमनप्रीत कौरसह  मंगळवारी पत्रकार परिषदेत  आगामी वर्ल्ड कपसाठी संघ उत्सुक असल्याचे म्हटले आहे. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात  महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शफालीऐवजी प्रतिका रावल हिला पसंती, कारण...

भारतीय संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिके खेळणार आहे. या दोन्ही स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 'लेडी सेहवाग'ला अर्थात शफाली वर्माला स्थान मिळालेले नाही.   २१ वर्षीय स्फोटक बॅटर शफाली वर्मा हिने इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिकेतून भारतीय संघात कमबॅक केले होते. पण वनडेत तिच्यावर भरवसा दाखवण्यापेक्षा भारतीय महिला संघाने प्रतिका रावलवर भरवसा दाखवला आहे. वनडे पदार्पण केल्यापासून स्मृतीसोबत ती दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे शफाली वर्माचा पत्ता कट झालाय.  

वर्ल्ड कप संघाबद्दल काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

पॉवर प्लेमध्ये रेणुका आणि क्रांती उत्तम गोलंदाजी करू शकता. स्लॉग ओव्हर्समध्ये श्री चरणी, दीप्ती आणि राधा गोलंदाजी करतील. मधल्या ओव्हर्समध्ये स्नेह राणा उपयुक्त ठरेल, असे सांगत वनडे वर्ल्ड कपसाठी निवडलेला संघ संतुलित असल्याचे म्हटले आहे. नीतू डेविड यांनी रेणुकाही भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू असल्याचे सांगत ती दुखापतीतून सावरून मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे।

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (विकेट किपर/बॅटर), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्रीचरणी, यास्तिका भाटिया,  राधा यादव. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (विकेट किपर/बॅटर), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्रीचरणी, यस्तिका भटिया,  राधा यादव.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाबीसीसीआय