Join us

Rohit Sharma Team India: टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Team India: भारतीय संघाची नजर विशेषत: आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकावर आहे. आता रोहित शर्माने संघातील खेळाडूंच्या रोटेशनवर वक्तव्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:43 IST

Open in App

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका जिंकली. त्याआधी इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-२० मध्ये विजयाचा झेंडा फडकवला होता. आता भारतीय संघाच्या नजरा विशेषत: आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकावर आहेत.

आता कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभर क्रिकेट सामन्यांचे आयोजन पाहता मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करणे आवश्यक असल्याचे मत रोहित शर्माने व्यक्त केले. गेल्या T20 विश्वचषकाच्या ग्रुप सामन्यांतूनच बाहेर पडल्यानंतर, भारतीय संघ खेळाडूंसोबत सातत्याने प्रयोग करत आहे. ज्यामध्ये दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंटचीही भूमिका आहे.

वर्कलोड मॅनेज करणं आवश्यक“आम्ही भरपूर क्रिकेट खेळतो, त्यामुळे दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे. अशा स्थितीत खेळाडूंना रोटेट लागते. रोटेट केल्याने आमच्या बेंच स्ट्रेंथला मैदानावर खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक खेळाडू आजमावू शकतो,” असे मत रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सच्या फॉलो द ब्लूज मध्ये व्यक्त केले.

भारतीय संघाचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये असावे हे आम्ही निश्चित करत आहोत. हीच ती योजना आहे, ज्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही तो म्हणाला. रोहित ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणार्या टी 20 विश्वचषकापूर्वी या महिन्यापासून सुरू होत असलेल्या आशिया चषकाच्या टीमचं नेतृत्व करण्याच्या तयारी करत आहे.

द्रविडबाबतही वक्तव्य“पुढील वाटचालीसाठी काय अपेक्षा करू हे माहित नाही. परंतु संघाने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. जेव्हा राहुल द्रविडनं प्रशिक्षकाची जबाबादारी स्वीकारली तेव्हा आम्ही एकत्र बसून संघाला पुढे नेण्याच्या योजनेवर चर्चा केली. त्यांचे विचारही माझ्यासारखेच आहेत, त्यामुळे हे काम सोपे झाले,” असेही रोहित म्हणाला.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघएशिया कपराहुल द्रविड
Open in App