Join us

इंग्लंडविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियानं महाकालेश्वर मंदिरात जाऊन केली प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल

सेमीचा पेपर सोपा करण्यासाठी पराभवाची हॅटट्रिक टाळून साधावा लागेल विजयी हॅटट्रिकचा डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:17 IST

Open in App

Indian Womens Cricket Team Seeks Blessings At Mahakaleshwar Temple After World Cup Defeats : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या लढती आधी कर्णधार हरमनप्रीत कौरसह टीम इंडियातील खेळाडूंनी  उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन प्रार्थना केल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियातील खेळाडूंनी बुधवारी सकाळी भस्म आरतीला हजेरी लावत नंदी हॉलमध्ये बसून भगवान शिव यांची पूजा अर्चना केल्याचे पाहायला मिळाले. महाकालेश्वर मंदिरातील टीम इंडियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

... अन् टीम इंडियावर ओढावली सलग दोन पराभवाची नामुष्की

भारतीय संघाने घरच्या मैदानात सुरु असलेल्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली सुरुवात केली. पण सलग दोन विजयानंतर टीम इंडियाच्या पदरी दोन पराभवाची नामुष्की ओढावली. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभवाचा धक्का दिला. आता रविवारी भारतीय संघ मध्य प्रदेश येथील इंदूरच्या मैदानात  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कमबॅक करून सेमीची आस कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ICC Womens World Cup 2025 Points Table: टीम इंडियासह कोणत्या संघासाठी कसे असेल सेमीचं समीकरण?

इगंल्डंल विरुद्धच्या लढती आधी संघातील खेळाडूंनी घेतल महाकालेश्वराचं दर्शन

इंग्लंड विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय महिला संघातील खेळाडूंनी महाकालेश्वराचा अशिर्वाद घेतला. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव, श्री चरणी यांच्यासह अन्य खेळाडू आणि प्रशिक्षकही महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले. 

सेमीचा पेपर सोपा करण्यासाठी पराभवाची हॅटट्रिक टाळून साधावा लागेल विजयी हॅटट्रिकचा डाव 

भारतीय महिला संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह ४ गुणांची कमाई केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या लढतीत पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. एवढेच नाहीतर ही हॅटट्रिक टाळत उर्वरित तिन्ही सामने जिंकून भारतीय संघ सेमीचा पेपर सोपा करण्यासाठी मैदानात उतरेल. स्वबळावर सेमीफायनल गाठायची असेल तर टीम इंडियाला सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागतली. इंग्लंडशिवाय भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Women's Cricket Team visits Mahakaleshwar Temple before England match.

Web Summary : Ahead of the crucial match against England, the Indian Women's Cricket team sought blessings at Ujjain's Mahakaleshwar Temple after facing defeats in the World Cup. Players including Harmanpreet Kaur, attended Bhasma Aarti, praying for victory and a strong comeback to secure a spot in the semi-finals.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडहरनमप्रीत कौरस्मृती मानधना