टीम इंडियाच्या खेळाडूंना एकत्र चित्रपटगृहात जाऊन पाहिला 'बॉर्डर २' सिनेमा, पाहा खास VIDEO

Team India Border 2 Movie: याआधी संघाने एकत्रित धुरंधर चित्रपट पाहिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:29 IST2026-01-27T15:28:11+5:302026-01-27T15:29:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Team India players went to the cinema together and watched the movie 'Border 2', watch special VIDEO | टीम इंडियाच्या खेळाडूंना एकत्र चित्रपटगृहात जाऊन पाहिला 'बॉर्डर २' सिनेमा, पाहा खास VIDEO

टीम इंडियाच्या खेळाडूंना एकत्र चित्रपटगृहात जाऊन पाहिला 'बॉर्डर २' सिनेमा, पाहा खास VIDEO

Team India Border 2 Movie: भारतीय संघ सध्या टी२० मालिका खेळत आहे. २८ जानेवारीला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू विशाखापट्टणमला पोहोचले आहेत. तिथे पोहोचल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या बॉर्डर २ चित्रपटाचा आनंद घेतला. भारतीय संघाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओल, वरुण धवन स्टारर बॉर्डर २ चित्रपट पाहिला. टीम इंडियाचे सर्व खेळाडू २६ जानेवारी रोजी चित्रपट पाहण्यासाठी वरुण आयनॉक्स येथे पोहोचले.

धुरंधर नंतर टीम इंडियाने बॉर्डर २ पाहिला..

'धुरंधर'नंतर 'बॉर्डर २' हा दुसरा चित्रपट आहे, जो भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी थिएटरमध्ये एकत्र पाहिला. अक्षय खन्ना आणि रणबीर सिंग अभिनीत धुरंधर हा चित्रपट गेल्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यासाठी लखनौमध्ये होती. १५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतीय संघाने लखनौमधील फिनिक्स प्लाझा येथे एकत्र 'धुरंधर' चित्रपट पाहिला होता. त्यानंतर आता टीम इंडियाने बॉर्डर २ चित्रपटाचा आनंद लुटला.

टी२० मालिकेत भारत वरचढ

२६ जानेवारीला बॉर्डर २ पाहिल्यानंतर, टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यासाठी त्याच उत्साहाने परतण्याची अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारताने मालिका आधीच सुरक्षित केली आहे. आता चौथा आणि पाचवा टी२० सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचे आणि २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.

विशाखापट्टणममधील भारताचा टी२० विक्रम

भारतीय संघ विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी२० सामना खेळणार आहे. यापूर्वी, भारताने येथे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांविरुद्ध चार टी२० सामने खेळले होते, ज्यात तीन जिंकले आणि एकात पराभव पत्करावा लागला.

Web Title : टीम इंडिया ने एक साथ सिनेमाघर में देखी 'बॉर्डर 2' मूवी।

Web Summary : टी20 सीरीज के लिए विशाखापत्तनम में टीम इंडिया ने एक साथ 'बॉर्डर 2' का आनंद लिया। 'धुरंधर' के बाद, यह दूसरी फिल्म है जिसे टीम ने सामूहिक रूप से देखा। भारत का लक्ष्य न्यूजीलैंड के खिलाफ क्लीन स्वीप और टी20 विश्व कप 2026 के लिए क्वालीफाई करना है।

Web Title : Team India watches 'Border 2' movie together in theatre.

Web Summary : Team India, in Visakhapatnam for the T20 series, enjoyed 'Border 2' together. Following 'Dhurandhar', this is the second movie the team watched collectively. India aims for a clean sweep against New Zealand and qualification for the T20 World Cup 2026.