Join us

Team India ODI Schedule : वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार?

बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:56 IST

Open in App

Team India ODI Schedule Till 2027 World Cup : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं दमदार कामगिरी करून दाखवली. दुबईच्या मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय संघानं तिसऱ्यांदा मिनी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या स्पर्धेनंतर आता थेट २०२७ मध्ये वनडे वर्ल्ड कपच्या रुपात आयसीसीची मोठी स्पर्धा पार पडेल. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे यांच्या यजमानपदाखाली पार पडणार आहे. त्याआधी भारतीय संघ कधी अन् किती वनडे सामने खेळणार त्याचे वेळापत्रक समोर आले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ एकूण ९ वनडे मालिका खेळणार आहे. प्रत्येक मालिका ही ३ सामन्याची असेल. भारतीय संघ आगामी दोन वर्षांत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या विरुद्धच्या मालिकेत एकूण २७ सामने खेळणार आहे.

 बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ऑगस्टमध्ये भारतीय संघ पहिली वनडे मालिका ही बांगलादेश दौऱ्यावर खेळेल. ३ सामन्यांच्या या द्विपक्षीय मालिकेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. इथंही भारतीय संघ ३ सामन्यांची वनडे मालिका खेळताना दिसेल.

पहिल्या २ मालिकेनंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पाहुणचार  

नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ या कालावधीत भारतीय संघ घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिके खेळताना दिसेल. ही मालिका यावर्षातील भारतीय संघाची शेवटची वनडे मालिका असेल. 

नव्या वर्षाची सुरुवात घरच्या मैदानातील वनडे मालिकेतून

जानेवारी २०२६ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलनंतर दोन्ही संघातील ही पहिली वनडे मालिका असेल. या मालिकेनंतर थेट जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ३ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड आणि  डिसेंबर २०२६ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात प्रत्येकी ३-३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.  

कोण कुठपर्यंत टिकणार? विराटसह रोहित वर्ल्ड कपमध्ये दिसणार?

दोन वर्षांत भारतीय संघ ८ संघांविरुद्धच्या वनडे मालिकेतून २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी आपली संघ बांधणी करेल, मिनी वर्ल्ड कप संघातील कितीजण वनडे वर्ल्ड कप खेळताना दिसणार हा मुद्दाही चर्चेचा विषय आहे. विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो आगामी वनडे वर्ल्ड कमध्येही दिसू शकतो. सर्वात मोठा प्रश्न असेल तो रोहित शर्माचा. विद्यमान कॅप्टन रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर निवृत्तीच्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय. हा पल्ला पार करून तो वनडे वर्ल्ड कपपर्यंत संघात टिकणार का ते पाहण्याजोगे असेल.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध बांगलादेशभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहली