Suryakumar Yadav Team India, Ind vs Eng 3rd T20: राजकोट पहिले दोन सामने जिंकून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भक्कम आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे अधिक वाट न बघता आज तिसन्या सामन्यासह मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा मानस असेल मात्र, टी-२० विशेषढ़ा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णधार सूर्यकुम्बार यादवचा फॉर्म स्ख्या संघासाठी चिंतेचा विषय आहे. कारण, गेल्या वर्षी भारतीय संघाची कमान सांभाळल्यापासून सूर्याला फलंदाजीत मोठी कामगिरी करता आलेली नाही.
१७ डाव, ४२९ धावा, २८.८१ सरासरी
टी२० क्रिकेटमधील सूर्यकुमार यादव हा जगातील सर्वोतम फलंदाजांमध्ये गणला जातो. शिवाय त्याच्या कर्णधारपदाखाली टीम इंडिया सरस कामगिरी करते आहे. पण, सध्या सूर्याची बॅट रुसलेली आहे. गेल्या १७ डावांमध्ये त्याला २६८१७या सरासरीने ४२९ धावाच करता आल्या आहेत. याच ढिसाळ कामगिरीमुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघात निवड झाली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्येही सूर्याकडून निराशाजनक कामगिरी झालेली आहे.
भारतीय गोलंदाजी संयोजनात बदल नाही
- पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ केवळ एक विशेषज्ञ वेगवान गोलंदाज घेऊन खेळला होता.
- अष्टपैलू हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंगला चांगली साथ दिली. त्यामुळे या सामन्यातही ही जोडी वेगवान मारा करताना दिसू शकते.
- तरुण चक्रवर्ती आणि स्ती बिश्नोई मधल्या घटकांत बळी घेण्यात यशस्वी ठरत असलयामुळे भारताला गोलंदाजी विभागात फारशी चिंता नाही.
इंग्लंडसाठी करो या मरो...
मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाहुण्या इंग्लंड संघाला या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवाठाच लागेल, कर्णधार जोस बटलर बगळता इतर फलंदाज फारसा प्रभाव पाहू शकलेले नाहीत. विशेषतः फिरकीपटूविरुद्ध फलंदाज संघर्ष करताना दिसले. गोलंदाजीत आर्चरकडून इंगलंडाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने आपल्या धारदार वेगवान गोलंदाजीने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणलेले आहे. हे सातत्य तो कायम राखू शकतो
- सामना: सायंकाळी ७ पासून
- थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स
- स्ट्रीमिंग: हॉटस्टार
Web Title: Team India eyes T20 series win against England Suryakumar Yadav poor form a concern for the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.