सूर्या दादाची रॉयल एन्ट्री! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचं मराठमोळ्या थाटात जंगी स्वागत; पाहा VIDEO

लेट आला अन् पाच वर्षात वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:01 IST2026-03-10T19:00:00+5:302026-03-10T19:01:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup Winning Captain Suryakumar Yadav Receives A Warm Welcome As He Arrives At His Residence Watch Video | सूर्या दादाची रॉयल एन्ट्री! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचं मराठमोळ्या थाटात जंगी स्वागत; पाहा VIDEO

सूर्या दादाची रॉयल एन्ट्री! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचं मराठमोळ्या थाटात जंगी स्वागत; पाहा VIDEO

आयसीसी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला विक्रमी तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादव याचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. अहमदाबाद येथील मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय संघाने यंदाच्या हंगाम गाजवत छोट्या  फॉरमॅटमध्ये मोठा धमाका केला. पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना सूर्यानं कपिल पाजींसह एमएस धोनी आणि रोहित शर्मा या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सूर्या दादाचं जंगी स्वागत

सूर्या दादाच्या स्वागतासाठी त्याच्या देवनार येथील निवासी संकुलातील अलिशान घराच्या परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ढोल ताशाच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार सूर्यकुमार याचे स्वागत झाले. पुष्पगुच्छ आणि शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या वतीनं सूर्याचं औक्षणही करण्यात आलं. सोशल मीडियावर सूर्याच्या स्वागताच्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO)

विमानतळावरही चाहत्यांनी केली होती मोठी गर्दी

अहमदाबादच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर मुंबईच्या विमानतळावर सूर्याची झलक पाहण्यासाठी देखील क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याला वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन झाल्यावर कसे वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर  खूप छान वाटतं आहे, असे उत्तर भारतीय कर्णधाराने दिले. 

लेट आला अन् पाच वर्षात वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन झाला

सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा तिसरा कर्णधार आहे. २०२१ मध्ये त्याने वयाच्या ३० व्या वर्षी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण दमदार कामगिरीच्या जोरावर अवघ्या पाच वर्षात तो वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन झाला आहे. याआधी  त्याने सर्वोत्तम कॅचच्या जोरावर टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून दिली होती. २०२४ मध्ये सूर्याच्या एका अफलातून कॅचवर फायनल मॅच फिरली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने  दक्षिण आफ्रिकेला पराभूत ट्रॉफी  जिंकली होती. या हंगामानंतर रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमध्ये  निवृत्ती घेतल्यावर सूर्या भारतीय संघाचा नवा कर्णधार झाला. द्विपक्षीय मालिकेत दबदबा कायम राखत त्याने टी-२० वर्ल्ड कप जेतेपदाचा बचाव करण्यातही यश मिळवले आहे.

Web Title : सूर्यकुमार यादव की शाही एंट्री: विश्व चैंपियन का भव्य स्वागत

Web Summary : सूर्यकुमार यादव, जिन्होंने भारत को रिकॉर्ड विश्व कप जीत दिलाई, का मुंबई में भव्य स्वागत किया गया। प्रशंसकों ने उनकी कप्तानी का जश्न मनाया, जो दिग्गजों के नक्शेकदम पर है। उन्होंने पहले 2024 में एक महत्वपूर्ण कैच लेकर रोहित शर्मा के नेतृत्व में भारत को जीतने में मदद की थी।

Web Title : Suryakumar Yadav's Royal Entry: World Champion Welcomed in Grand Style

Web Summary : Suryakumar Yadav, leading India to a record World Cup win, received a grand welcome in Mumbai. Fans celebrated his captaincy, which follows in the footsteps of legends. He previously secured a crucial catch in 2024, helping India win under Rohit Sharma's leadership.