T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : मोहम्मद हाफिजनं दोन टप्पा चेंडू टाकला, डेव्हिड वॉर्नरनं बघा तो कसा व कुठे भिरकावला, Video 

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:14 PM2021-11-11T22:14:15+5:302021-11-11T22:15:24+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : Two bounces and a six, That was a very funny ball from Hafeez but a terrific effort from David Warner to hit that for Six, Video | T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : मोहम्मद हाफिजनं दोन टप्पा चेंडू टाकला, डेव्हिड वॉर्नरनं बघा तो कसा व कुठे भिरकावला, Video 

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : मोहम्मद हाफिजनं दोन टप्पा चेंडू टाकला, डेव्हिड वॉर्नरनं बघा तो कसा व कुठे भिरकावला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. त्यानं पहिल्याच षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शादाब खाननं ७व्या षटकात मार्शला ( २८) माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथही ( ५) काही कमाल न करता शादाबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, वॉर्नर सुसाट होता आणि त्यानं मोहम्मद हाफिजला मारलेला षटकार तर त्याहुन भन्नाट होता.

कर्णधार बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि फाखर जमान ( Fakhar Zaman) या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. या तिघांची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी. बाबरनं याही सामन्यात अनेक विक्रम करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला मागे टाकले. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) त्याचं कौतुक करण्याएवजी आपल्याच कर्णधाराची इभ्रत जाईल अशी माहिती दिली. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरचा प्रत्येक फटका परफेक्ट होता. बाबर-रिझवान जोडी चोरटी धाव घेत ऑसी गोलंदाजांना हैराण करत होती. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रिझवाननं दाणपट्टा सुरू केला अन् चौकार-षटकार खेचले. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या.  ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.  

पाहा डेव्हिड वॉर्नरचा षटकार... 




Web Title: T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : Two bounces and a six, That was a very funny ball from Hafeez but a terrific effort from David Warner to hit that for Six, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.