T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्का; हा 'मॅच विनर' खेळाडू स्पर्धेला मुकण्याची शक्यता

हेजलवूड इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून संघाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:52 IST2026-02-02T13:50:25+5:302026-02-02T13:52:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup After Pat Cummins Ruled Out Australia Sweat On Josh Hazlewood and Adam Zampa | T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्का; हा 'मॅच विनर' खेळाडू स्पर्धेला मुकण्याची शक्यता

T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्का; हा 'मॅच विनर' खेळाडू स्पर्धेला मुकण्याची शक्यता

भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाकिस्तानच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ०-३ अशी गमावली. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता संघाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड  ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या लढतींना मुकण्याची शक्यता आहे. हेजलवूड अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पॅट कमिन्स पाठोपाठ हेजलवूडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन संघाला धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळाले आहे. मिचेल स्टार्क निवृत्तीनं त्याची उणीव कोण भरून काढणार असा मोठा  प्रश्न ऑस्ट्रेलियन संघासमोर निर्माण झाला होता. त्यात पॅट कमिन्सची भर पडली. दुखापतीमुळे तो टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला. आता हेजलवूडच्या अनुपस्थितीने ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य टोनी डोडेमाईड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोलंबो येथे संघात सामील होणार असलेला हेजलवूड सध्या सिडनीतच थांबला असून तिथेच पुनर्वसन प्रक्रिया सुरू ठेवणार आहे.

IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता

हेजलवूड इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून संघाबाहेर

 जोश हेजलवूड अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तो  टी-२०वर्ल्ड कप मोहिमेसाठी तयार असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.  हेजलवूडला हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीलाच बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर पुनर्वसनादरम्यान त्यांना अ‍ॅकिलीसची समस्या उद्भवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ते आणि वैद्यकीय पथकाने निर्णय घेतला आहे की, हेजलवूड सध्या सिडनीतच राहून पुनर्वसन सुरू ठेवेलनिवडकर्ता टोनी डोडेमाईड यांनी मात्र हेजलवूड श्रीलंकेत नेमके कधी दाखल होईल, याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही.

५ फेब्रुवारीला सराव सामना 

 ग्लेन मॅक्सवेल, नेथन एलिस आणि टिम डेविड हे पाकिस्तान दौऱ्यावर नसल्यामुळे ३ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये संघात सामील होणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया ५ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध वॉर्म-अप सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील पहिला अधिकृत सामना ११ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 

अ‍ॅडम झाम्पाही स्नायू दुखापतीमुळे त्रस्त, पण...

लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाच्या फिटनेसवरही ऑस्ट्रेलियाची चिंता आहे. लाहोरमध्ये झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ग्रोइन दुखापतीमुळे झाम्पा फलंदाजीस उतरला नव्हता. मात्र कर्णधार मिचेल मार्शने त्याची दुखापत किरकोळ आहे, असे म्हटले आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर कोणताही धोका घेणे योग्य नव्हते. त्यामुळेच तो निर्णय घेतला, असे त्याने सांगितले.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियाचा संघ 

मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनली, टिम डेविड, बेन ड्वार्शुईस, कॅमेरुन ग्रीन, नेथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुह्नमॅन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टॉयनिस,
अ‍ॅडम झाम्पा, शॉन अ‍ॅबॉट (ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह)

Web Title: T20 World Cup After Pat Cummins Ruled Out Australia Sweat On Josh Hazlewood and Adam Zampa