T20 World Cup 2026 All 20 Teams Squads Youngest And Oldest Captain Full List : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या दहाव्या हंगामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंकेच्या संघाने २ फेब्रुवारीला आपला संघ जाहीर केल्यानंतर आता सर्व २० संघांची अधिकृत घोषणा झाली आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने सर्वात आधी २० डिसेंबरला संघाची घोषणा केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन युवांसह ४२ वर्षांचा कॅप्टनही चर्चेत
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी २० संघापैकी दोन संघांनी युवा खेळाडूंवर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. भारतीय वंशाचा दिलप्रीत बाजवा हा वयाच्या २३ व्या वर्षी या स्पर्धेत कॅनडाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर नेपाळच्या संघाकडून रोहित पौडेल हा देखील २३ व्या वर्षांचा आहे. हे दोन खेळाडू यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार आहेत. याशिवाय पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेला इटलीचा संघ सर्वात वयस्कर खेळाडूच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. इटलीचा कर्णधार वेन मॅडसेन याचे वय ४२ वर्षे इतके आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'अ' गटातील संघ आणि कर्णधार
- भारत- सूर्यकुमार यादव (वय ३५ वर्षे)
अभिषेक शर्मा, तिलक वर्मा,संजू सॅमसन,शिवम दुबे,ईशान किशन,हार्दिक पांड्या,अर्शदीप सिंग,जसप्रीत बुमराह, हर्षित राणा,वरुण चक्रवर्ती,कुलदीप यादव,अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर,रिंकू सिंग
- पाकिस्तान – सलमान अली आगा ( वय ३२ वर्षे)
अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.
- नामीबिया – गेरहार्ड इरास्मस (वय ३० वर्षे)
झेन ग्रीन, बर्नार्ड शॉल्झ, रुबेन ट्रंपेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लोफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डिलन लीचर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हेंगो. अलेक्झांडर वोल्शेंक (राखीव)
- नेदरलँड्स – स्कॉट एडवर्ड्स (वय २९ वर्षे)
कॉलिन अकरमन, नोआ क्रोस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, झॅक लायन-कॅशेट, मॅक्स ओ'डॉड, लोगन व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकेरेन, साकीब झुरफ.
- USA- मोनंक पटेल (वय ३२ वर्षे)
मोनंक पटेलचा भारताशी खास संबंध आहे. त्याने गुजरातकडून अंडर- १९ क्रिकेट खेळलं असून त्या काळात जसप्रीत बुमराह त्याचा सहकारी होता. तो अमेरिकेच नेतृत्व करताना दिसणार आहे.
जेसी सिंग, अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कामाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नॉथुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे.टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ब' गटातील संघ आणि कर्णधार
- ऑस्ट्रेलिया-मिचेल मार्श (वय ३४ वर्षे)
झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेविड, बेन द्वारशुइस, कॅमरुन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्कस स्टोयनिस, अॅडम झाम्पा.
- आयर्लंड-पॉल स्टर्लिंग (वय ३५ वर्षे)
मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग
- ओमान- जतिंदर सिंग (वय ३६ वर्षे)
विनायक शुक्ला, मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, शाह फैसल, नदीम खान, सुफयान मेहमूद, जय ओडेदरा, शफीक जान, आशिष ओडेदरा, जितेन रामानंदी, आमिर कलीम.
श्रीलंका- दसुन शनाका (वय ३६ वर्षे)
पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, कुसल जेनिथ परेरा, चरित असलंका, जेनिथ लियानागे, पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, मथीशा मल पाथिराना, एशान मलिंगा
- झिम्बाब्वे- सिकंदर रझा (वय ३९ वर्षे)
ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीम क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, ब्रेंडन टेलर.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'क' गटातील संघ आणि कर्णधार
- इंग्लंड- हॅरी ब्रूक (वय २६ वर्षे)
रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट, जोश टंग, ल्यूक वूड.
- इटली- वेन मॅडसेन (वय ४२ वर्षे)
मार्कस कॅम्पोपियानो, जियान पिएरो मीडे, झैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज कलुगामेज, हॅरी मॅनेन्ती, अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, सय्यद नक्वी, बेंजामिन मानेन्ती, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रँट स्टीवर्ट, थॉमस ड्रका
- नेपाळ - रोहित पौडेल (वय २३ वर्षे)
दीपेंद्र सिंग आयरी, संदीप लामिछाने, कुशल भुरटेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बसीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला, लोकेश बाम.
- स्कॉटलंड- रिची बेरिंग्टन (वय ३८ वर्षे)
टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्हज, झैनुल्लाह इहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रीथ, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील. प्रवासी राखीव खेळाडू: जॅस्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस, नॉन-ट्रॅव्हलिंग राखीव खेळाडू: मॅकेन्झी जोन्स, ख्रिस मॅकब्राइड, चार्ली टीअर.
- वेस्टइंडीज - शई होप (वय ३२ वर्षे)
शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ड' गटातील संघ आणि कर्णधार
- अफगाणिस्तान- राशिद खान (वय २७ वर्षे)
नूर अहमद, अब्दुल्ला अहमदझाई, सेदीकुल्लाह अटल, फजलहक फारुकी, रहमानउल्ला गुरबाज, नवीन उल हक, मोहम्मद इशाक रहीमी, शाहिदुल्ला कमाल, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, दरविश रसूल, इब्राहिम झदरन. राखीव: एएम गझनफर, इजाज अहमदझई आणि झिया उर रहमान शरीफी.
- कॅनडा- दिलप्रीत बाजवा ( वय २३ वर्षे)
अजयवीर हुंदल, अंश पटेल, दिलोन हेलिगर, हर्ष ठाकर, जसकरणदीप सिंग, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, रविंदरपाल सिंग, साद बिन जफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा, युवराज समरा.
- न्यूझीलंड- मिचेल सँटनर (वय ३३ वर्षे)
फिन एलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सेफर्ट, ईश सोधी.
- दक्षिण आफ्रिका -एडन मार्करम (वय ३१ वर्षे)
कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को जॅनसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स
- UAE – मुहम्मद वसीम ( वय ३१ वर्षे)
अलिशान शराफू, आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दिकी, मयंक कुमार, मुहम्मद अरफान, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, रोहिद खान, सोहेब खान, सिमरनजीत सिंग.
Web Summary : The T20 World Cup 2026 features 20 teams, including Canada led by Dilpreet Bajwa, the youngest captain at 23. Italy has the oldest captain, Wayne Madsen, at 42. The tournament includes teams from various groups, such as India, Pakistan, and Australia, each with their respective captains and squads.
Web Summary : टी20 विश्व कप 2026 में 20 टीमें हैं, जिनमें कनाडा का नेतृत्व 23 वर्षीय दिलप्रीत बाजवा कर रहे हैं, जो सबसे युवा कप्तान हैं। इटली के कप्तान वेन मैडसेन 42 वर्ष के हैं, जो सबसे उम्रदराज हैं। टूर्नामेंट में भारत, पाकिस्तान और ऑस्ट्रेलिया जैसे विभिन्न समूहों की टीमें शामिल हैं, जिनमें प्रत्येक के अपने कप्तान और टीम हैं।