Join us

T20 World Cup 2022: भारताच्या अर्शदीप सिंगचा बोलबाला! जाणून घ्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे टॉप-10 गोलंदाज

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-20 विश्वचषकात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:32 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-20 विश्वचषकात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना चितपट करत आहेत. आतापर्यंत या हंगामात श्रीलंकेच्या वानिदू हसरंगाने सर्वाधिक 10 बळी पटकावले आहेत. श्रीलंकेच्या संघाने राऊंड फेरी खेळून विश्वचषकात प्रवेश केला आहे, त्यामुळे श्रीलंकेचे आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वच संघानी 3-3 सामने खेळले आहेत. गुणतालिकेतून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या संघाचे चित्र देखील हळू-हळू स्पष्ट होत आहे. ग्रुप एमध्ये न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानी आहे, तर ग्रुप बीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वर्चस्व आहे. खरं तर ग्रुप ए मधून न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान, ग्रुप एमधून उपांत्य फेरी गाठण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. तर ग्रुप बीमधून दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज उपांत्य फेरी गाठेल. त्यामुळे सध्या 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ देखील उपांत्य फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला, त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. 

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल भाष्य करायचे झाले तर, मागील वर्षी 2021 मध्ये श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 16 बळी घेतले होते. त्याच्याआधी 2016 मध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (12), दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर आणि अहसान मलिक (नेदरलँडचा 12) या तिघांनी प्रत्येकी 12-12 बळी पटकावले होते. तर 2012 च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेच्या अजंता मेंडिसने (15) बळी घेतले होते. याशिवाय 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डर्क नॅन्सने सर्वाधिक (14) बळी घेतले होते. लक्षणीय बाब म्हणजे 2009 आणि 2007 मध्ये पाकिस्तानच्या उमर गुलने दोन्हीही हंगामात सर्वाधिक 13-13 बळी पटकावले होते. 

गोलंदाज सामने बळीसरासरीएका डावात 4/5 बळीसर्वोत्तम कामगिरी
वानिंदू हसरंगा (श्रीलंका)6107.080/03/8
बॅस डी लीड (नेदरलॅंड्स)698.660/03/19
ब्लेसिंग मुजरबानी (झिम्बाब्वे)697.000/03/23
सिकंदर रझा (झिम्बाब्वे)696.600/03/19
महीश तीक्ष्णा (श्रीलंका)696.630/02/15
तस्कीन अहमद (बांगलादेश)388.180/14/25
सॅम करन (इंग्लंड)276.151/05/10
अर्शदीप सिंग (भारत)377.830/03/32
पॉल वॅन मीकरन (नेदरलॅंड्स)675.660/02/21
ट्रेन्ट बोल्ट (न्यूझीलंड)264.621/04/13

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतीय क्रिकेट संघअर्शदीप सिंगश्रीलंकाआॅस्ट्रेलियाआयसीसी
Open in App