Join us

Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)

Team India meet PM Modi Video: भारतीय संघ आज मायदेशी परतल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:26 IST

Open in App

Team India meet PM Modi Video: भारतीय संघाच्या विश्वविजेत्या शिलेदारांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाची फायनल जिंकली. आफ्रिकेला सात धावांनी मात देत टीम इंडियाने १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० वर्ल्डकप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, इतर खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, त्याचा सपोर्ट स्टाफ आणि इतर स्टाफ यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीम इंडियाने घेतलेल्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये PM मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच खेळाडूंनी जवळपास दीड तास मोदींशी गप्पा मारताना विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. पाहा व्हिडीओ-

भारतीय संघ पहाटे बार्बाडोसवरून साडेचारच्या सुमारास विशेष विमानाने भारताच्या दिशेने रवाना झाला. भारतीय संघाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पाठवण्यात आले. त्याचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला होता. AIC24WC (Air India Champions 24 World Cup) नावाचे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान तेथे गेले होते. भारतीय संघ, त्यांचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही अधिकारी आणि भारतीय प्रसारमाध्यमे यांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवले होते. चक्रीवादळामुळे हे सर्व जण तेथे अडकून पडले होते. अखेर आज भारतीय संघ सकाळी ६ वाजता भारतात दाखल झाला. दिल्लीकरांचे स्वागत स्वीकारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर विजय मिरवणुकीसाठी संघ मुंबईला रवाना झाला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघपंतप्रधाननरेंद्र मोदीरोहित शर्माविराट कोहलीराहुल द्रविड